लग्नाचा दिवस हा आनंदाचा असतो, या दिवशी नव्या आयुष्यासाठी जितका उत्साह असतो तितकीच जास्त भिती दोघा नवरा-नवरीच्या मनात असते. पण हल्ली लग्नातील वेगवेगळ्या ट्रेंडमुळे डान्स परफॉर्मन्स आणि वेगवेगळ्या भन्नाट आयडियाज वापरण्यात येत असल्यामुळे लग्नाच्या दिवशी असलेली ही भिती मनात येत नाही. हल्लीच्या काळात तर नवरा-नवरी आणि त्यांचे कुटूंबिय या आनंदाच्या दिवशी आनंद लुटतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. लग्नापूर्वीचा हा व्हिडीओ असून यात नवरीचा हा बिनधास्त अंदाज पाहून तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आल्याशिवाय राहणार नाही.

पहिल्या इशाऱ्यातच दिलं उत्तर
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नववधू लाल रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. ती वरमालाच्या विधीसाठी स्टेजवर येत असते. तितक्यात तिचा एक मित्र तिथे येतो आणि तिला विचारतो, ‘काय चाललं आहे.’ यावर मुलगी आधी सुरूवातीला हसते आणि नंतर हातवारे करून उत्तर देते.

प्रतिक्रिया बघून सगळे हसू लागले
मित्राच्या प्रश्नावर नवरी स्वतःला रोखू शकली नाही आणि ‘धक-धक करने लगा, मोरा जियारा डरने लगा’ हे गाणं गात तिच्या भावना त्याला सांगते. गाण्यासोबतच ती डान्स स्टेप्सही करून दाखवते. त्याची प्रतिक्रिया पाहून तिथे उभे असलेले इतर लोकही हसू लागतात.

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :


नववधूची ही स्टाईल लोकांना एवढी आवडली आहे की ते हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ सुमारे तीन हजार वेळा पाहिला गेला आहे.

Story img Loader