Shocking video: सण कोणताही असो, महिलांना मेहंदी काढण्यासाठी फक्त निमित्त हवे असते. हिंदू धर्मात मेहंदी काढणे शुभ मानले जाते. भारतीय परंपरेत विवाह सोहळ्यात नववधुला मेहंदी काढण्याची पद्धत आहे.सिनेमातील मेहंदीवर रचलेली गाणी व नृत्य अशा मनोरंजक कार्यक्रमांंची धमाल असल्याशिवाय हा लग्नविधी पुर्ण होत नाही.प्रत्येक नववधू या मेहंदीच्या विधीची अगदी आतुरतेने वाट बघते. मात्र सध्या नवरीच्या मेहेंदीचा असा व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून लोक घाबरले आहेत. या मेहंदीचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेहंदीच्या डिझाइनचे व्हिडीओ पाहिले की वाहह सुरेख अशी प्रतिक्रिया सामान्यपणे तोंडातून निघायला हवी. मेहंदीचा व्हिडीओ पाहून कुणी घाबरलं असं सांगितलं तर साहजिकच आश्चर्य वाटेल. असं या मेहंदीमध्ये नेमकं काय आहे तरी काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका नवरीने तिच्या मेहंदीचा पूर्ण व्हिडीओ दाखवला आहे. सुरुवातीला तिचा मोकळा हात दिसतो. त्यानंतर आर्टिस्ट हळूहळू तिच्या हातावर मेहंदीने डिझाइन काढते. नवरीला आपल्या हातावरील सुंदर मेहंदी डिझाइन दाखवायची होती पण लोकांचं व्हिडीओत लक्ष भलतीकडेच गेलं.नवरीच्या एका हातावरील नसेवर कापल्याची खूण होती. लोकांचं लक्ष मेहंदीऐवजी इथंच गेलं आणि त्यांनी कमेंट्स करायला सुरुवात केली. एका युझरनं म्हटलं या लग्नासाठी नवरीला खूप मेहनत करावी लागली, दुसऱ्या युझरनं म्हटलं याला लव्ह मॅरेजवाली मेहंदी म्हटलं आहे. एकाने तर याला घरच्यांना मनवण्याची निंजा टेक्निक म्हटलं आहे.

सोशल माध्यमांचा वाढता वापर यामुळे जग जवळ आले आहे. मात्र या माध्यमातून हाय हॅलोपासून सुरु झालेला संवाद पुढे भावनिक गुंता वाढवत आहे. यातून गाठीभेटी व जवळीकता वाढल्याने परिस्थितीचा विपर्यास केला जात आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ mu_s_kan70 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी तुटून पडले असून व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, जबरदस्ती लग्न केलं आहे, तर दुसरा म्हणतोय, धमकी देऊन लग्न केलं आहे. आणखी एकानं घरचे लग्नाला तयार होत नसतील म्हणून हाताची नस कापण्याचा प्रयत्न दिसतोय. अशा अनेक प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.