Brides Parents dances Oo Antava song: प्रत्येक आई बापाचं स्वप्न असतं की आपल्या मुलीला चांगला जोडीदार मिळावा आणि तिचं लग्न अगदी थाटामाटात व्हावं. आई-वडील खूप कष्ट करून आपल्या मुलीला लहानाचं मोठं करतात. तिचे हट्ट पुरवतात, तिला चांगलं शिक्षण देतात. पण, एक वेळ अशी येतेच जेव्हा ती हे सगळं सोडून आपल्या सासरी जाते.

आपल्या पोटचा जीव असा आपल्यापासून दूर जातोय याचं वाईट जितकं आई- वडिलांना वाटत असतं तितकाच आनंद तिला चांगला जोडीदार, चांगलं सासर मिळाल्याचा असतो. मुलीच्या या लग्नासाठी आई-वडिलांनी खूप स्वप्न पाहिलेली असतात.

Marathi actress Tejaswini Sunil married to Shreeram Nijampurkar
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Dad and daughter dance
“गोरी गौरी मांडवाखाली…”, हळदीमध्ये बाप-लेकीचा धिंगाना! अफलातून डान्स Video होतोय Viramu
asha bhosle sings trending gulabi sadi song
Video : गुलाबी साडी…; ९१ व्या वर्षी आशा भोसलेंचा जबरदस्त अंदाज! हुकस्टेप करत गायलं संजू राठोडचं ट्रेडिंग गाणं
Marathi actress aishwarya narkar and avinash narkar welcoming 2025 share dance video
Video: ‘पुष्पा २’मधील गाण्यावर डान्स करत ऐश्वर्या-अविनाश नारकरांनी नवीन वर्षाचं केलं स्वागत, शुभेच्छा देत अभिनेत्री म्हणाल्या…
Couple dance video husband wife dance in wedding on marathi song
VIDEO: आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे! नवरा बायकोनं असा डान्स केला की सगळे नातेवाईक पाहतच राहिले
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
School teacher dance on marathi song pavan jevala kay song with student school video goes viral
पाव्हणं जेवला काय? जिल्हा परिषद शाळेत सरांचा विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स; VIDEO पाहून म्हणाल शिक्षक असावा तर असा!

आजकाल लग्नसोहळा एखाद्या उत्सवासारखा साजरा केला जातो. साखरपुडा, मेंदी, संगीत, हळद मग लग्न अशा साग्रसंगीत कार्यक्रमांची मांदियाळी असते. त्यात आजकाल लग्नात खास डान्स परफॉर्मन्स करणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे. सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील अशा डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण सध्या एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे, ज्यात वधूचे आई-बाबा स्टेजवर खास परफॉरमन्स करताना दिसतायत.

हेही वाचा… पुणेकरांचा विषय हार्ड! शेतात लावली अशी पाटी की पुढे जायची कोणी हिंमत करणार नाही; वाचून पोट धरून हसाल

नववधूच्या आई-बाबांचा जबरदस्त डान्स

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मुलीच्या लग्नसोहळ्यात तिचे आई-बाबा स्टेजवर जबरदस्त परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनीत ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंटवा’या प्रसिद्ध गाण्यावर वधूचे आई-वडील जबरदस्त ठेका धरताना दिसत आहेत. समांथा प्रभूच्या या गाण्यावर कपलने हुबेहूब स्टेप्स करत स्टेजवर धमाका केला असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. अगदी एनर्जेटिक परफॉर्मन्स करत आई-वडिलांनी मुलीच्या या लग्नसोहळ्यात चार चाँद लावले आहेत.

वधूच्या आई-वडिलांच्या डान्सचा व्हिडीओ @silver_shimmer_choreography या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “वय हा फक्त एक आकडा आहे याचा पुरावा” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… “मुलगी काळी…”, नवरदेवाने घेतला जगात भारी उखाणा, VIDEO पाहून कराल कौतुक

युजर्सच्या प्रतिक्रिया

इतका सुंदर परफॉर्मन्स बघून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “ते डान्सचा मनसोक्त आनंद घेतायत हे पाहून मला खूप छान वाटलं.” तर दुसऱ्याने “हे क्षण अनमोल आहेत”, अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “काका खूप क्यूट आहेत.”

Story img Loader