Bride Haldi Video Viral: लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. अगदी मेहंदी, संगीत, हळद व लग्न अशा साग्रसंगीत कार्यक्रमांची मांदियाळी असते. त्यात काही ठिकाणी हळद खूप गाजवली जाते. अगदी डीजे, बॅंजो ठेवला जातो. या बेंजोवर सगळे थिरकतात, डान्स करतात मजा करतात. लग्न होऊन सासरी जाणारी नवरीदेखील अगदी या हळदीत मनसोक्त नाचते. हळद प्रत्येक नवरीसाठी अगदी खास असते.
सोशल मीडियावर लग्नसमारंभातील असे अनेक व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. त्यात हळदीतील नवरीच्या डान्सचे व्हिडीओ याआधी तुम्ही पाहिलेच असतील. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात हळदीने माखलेली नवरी चक्क बेंजो वाजवताना दिसतेय.
नवरीचा व्हिडीओ व्हायरल
लवकरच लग्नबंधनात अडकणाऱ्या या नवरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये हळदी समारंभात नवरीने अगदी बेभान होऊन बेंजो वाजवला आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, हळदीने माखलेली नवरी अगदी फर्स्टक्लास बेंजो वाजवताना दिसतेय. बेंजो वाजवताना तिच्या चेहऱ्यावरदेखील खूप आनंद दिसतोय, व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी या नवरीचं कौतुक केलंय.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या @soloperformance__ अकांउटवरून शेअर करण्यात आला असून सावधान, “नवरीचा तुफान” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला ३० लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय, हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
नवरीचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “कलयुगात आता अजून काय काय पाहायला मिळणार आहे, काय माहित”, तर दुसऱ्याने “ताई खूप छान वाजवलंस” अशी कमेंट केली; तर एकजण कमेंट करत म्हणाला, “अशी नवरी पाहिजे एक नंबर” तर एकाने “खूपच भारी एकच नंबर” अशी कमेंट केली.