Bride plays drum viral video: लग्न सराईचा सीजन असल्यानं सोशल मीडियावर लग्न सोहळ्याचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. केरळमधील एका नवरीने तिच्या लग्नात स्वत:च ढोल वाजवून लग्नसोहळ्यात आनंदाचं वातावरण निर्माण केलं. एरव्ही लग्न मंडपात बॅंड वाजवताना पाहुणे आलेले वाजंत्री पाहतो. पण ही स्वत:च वाजंत्री बनली आणि लग्नात बॅंड बाजा वाजवून एकच जल्लोष केला. नवरीच्या या भन्नाट व्हिडीओची इंटरनेटवर एकच चर्चा रंगलीय. देशभरात लग्नाचा माहोल असताना अनेक जण ढोल ताशाच्या गजरात थिरकताना दिसतात. नवरा नवरीचेही डीजेच्या तालावर रोमॅंटिक डान्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण खुद्द नवरीने तिच्या लग्नात ढोल वाजवून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भर लग्न मंडपात नवरी तिचे पारंपारीक विधी सोडून थेट ढोल वाजवण्याचा मनमुराद आनंद लुटताना या व्हिडीओत दिसत आहे. तामिळनाड चेंडा वाद्य खूप लोकप्रीय आहे. वडीलांचा चेंडा वाजवण्याचा पेशा असल्याने नवरीनेही चेंडा वाजवून वडीलांच्या कलेला दाद दिली. एव्हढच नाही तर नवरीला चेंडा वाजवताना नवऱ्याने पाहिलं अन् त्यानेही तिला साथ देण्यास सुरुवात केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. नवरा आणि वडीलांनी दिलेली साथ पाहून नवरीचा ढोल वाजवण्याचा जोश आणखीनच वाढला. तिच्यासोबत असलेले वाजंत्रीही जोरजोरात ढोल वाजवताना व्हिडीओत दिसत आहेत.
इथे पाहा व्हिडीओ
@LHBCoach नावाच्या एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत युजरने कॅप्शनमध्ये म्हटलंय, “गुरुवायूर मंदिरात लग्न सोहळ्याचं संपन्न झाला. नवरीचे वडील प्रसिद्ध चेंडा मास्टर आहेत. त्यामुळे नवरीचाही तिच्या लग्नात चेंडा वाजवण्याचा उत्साह शिगेला पोहोचला. आपल्या मुलीला चेंडा वाजवताना पाहून नवरीचे वडीलांनीही यात सहभाग घेतला. तसंच होणाऱ्या बायकोचा चेंडा वाजवण्याचा उत्साह पाहून नवऱ्यालाही चेंडा वाजवण्याचा मोह आवरला नाही.” दरम्यान, या व्हिडीओला आतापर्यंत २ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर १४ हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. हा जबरदस्त व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.