सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात पण सध्या एका अशा लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्याची तुम्ही कदाचित कल्पनाही केली नसेल. हा व्हायरल व्हिडिओ २ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारणही तसे हटकेच आहे. सहसा लग्नांच्या विधींमध्ये नवरदेव नवरीच्या भांगेत कुंकू भरतो पण तुम्ही कधी एखाद्या नवरीला नवरदेवाच्या भांगेत कुंकू भरताना पाहिले आहे का? नसेल तर हा व्हिडीओ नक्की पाहा. हे लग्न अगदी हटके पद्धतीने पार पडले आहे. व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपल्या जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक आजकाल नवनवीन गोष्टी करतात. पण त्यामुळे आपली संस्कृती बदलत आहे आहे असा आरोप सोशल मीडियावर अनेकांनी केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वर आपल्या वधूच्या भांगेत कुंकू भरतो त्यानंतर वधूलाही आपल्या भांगेत कुंकू भरण्यास सांगतो. हे ऐकून नवरीला हसू येते आणि ती नकार देते. यानंतर वधूही हसत हसत नवरदेवाच्या भांगेत कुंकू भरते. इंस्टाग्रामवर या जोडप्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. पोस्टमध्ये सांगितले आहे की, ते दोघे पहिल्यांदा जिममध्ये भेटले होते. कुश राठौर असे या व्यक्तीचे नाव आहे, तर त्याच्या पत्नीचे नाव कसक गुप्ता आहे.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
emotional video of Husband wife supporting each other in bad phase viral video on social media
साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात! वाईट काळातही त्याच्याबरोबर उभी राहिली, नवरा-बायकोचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Mumbai railway platform Thief got caught stealing wallet inside shocking video goes viral
मुंबईकरांनो चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या मागे उभे राहतात अन्…VIDEO एकादा पाहाच

हेही वाचा – ‘What’s wrong with India’ हा हॅशटॅग का होतोय ट्रेंड? सोशल मिडियावर पेटला नवा वाद

हेही वाचा – कपडे इस्त्री करण्यासाठी महिलेने वापरला प्रेशर कुकर; जुगाड पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले……

कुशने सांगितले की कसक हे त्यांची सिनिअर होती. २०१३मध्ये त्यांनी पहिल्यांदा बोलण्याचा प्रयत्न केला. काही काळ डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न केले. मात्र, आता लोक या व्हिडिओवर समिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी संस्कृती बदलण्याचा आरोप करत टिका केली तर काहींनी नवीन प्रथा निर्माण केल्याबद्दल त्याचे कौतूक केले. एकाने व्हिडीओवर कमेंटर करत म्हटले, “सुंदर” तर दुसऱ्याने लिहिले, हे मी पाहिलेले आतापर्यंतचे सर्वात सुंदर रिल आहे. संपूर्ण कुटुंबासमोर हे करण्यासाठी खूप हिंमत्त लागते. ब्राव्हो! तिसऱ्याने लिहिले, ही फार छोटी गोष्ट आहे पण तितकीच वेगळी आहे.” चोथ्याने असे लिहिले, अरे यार, कुठे मिळतात अशी मुलं आजकाल”

Story img Loader