Viral Wedding सोशल मीडियावर वधू वराचे अनेक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतं असतात. सोशल मीडियाचा जगात एखादी घटना वाऱ्यासारखी पसरते. अशा एका लग्नाची गोष्ट सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या विचित्र लग्नाच्या चर्चेचं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नाच्या गाठी अगोदरच स्वर्गात बांधल्या जातात असे बोलले जाते. पण जर नवरा नवरीच सहमत नसेल तर लग्न कधीच शक्य नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरी भरमांडवात सर्व वऱ्हाड्यांसमोर लग्नाला नकार देते. मुलीचे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम असून दबावामुळे ती लग्न करू शकत नाही, असा दावा केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक मुलीच्या या निर्णयाचे स्वागत करत आहेत. मात्र, यावर काहींनी संतप्त प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नवरी नवरदेवाला लग्नास नकार देत असल्याचे दिसत आहे. त्याच वेळी, कुटुंब आणि नातेवाईक जवळ उपस्थित आहेत. @ankit6709j नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ही घटना खरी असल्याचा दावा युजरने कॅप्शनमध्ये केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. आतापर्यंत ४ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याच वेळी, तो वेगाने शेअर केला जात आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> दिल्लीत चाललंय काय? आधी धडक दिली, नंतर मिनी बसच्या बोनेटवरुन नेले; VIDEO होतोय व्हायरल

बराच वेळ लग्नाच्या मंडपात हा वाद सुरु राहिला. दरम्यान, मुलीने लग्नास नकार दिल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तरुण आणि तरुणाच्या नातेवाईकांसह त्यांचा मित्रपरिवार या सर्वांनाच पकडून ठेवले. या सर्वांनी विवाहासाठी आतापर्यंत झालेला खर्च परत करावा आणि हे लग्न मोडावे, अशी मागणी केली. नंतर हे संपूर्ण प्रकरण पोलिसांतही पोहोचले आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘कोणाशीही असे करू नये’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘हात जोडून मी मुलींना विनंती करतो की, त्यांना मुलगा आवडले नसेल तर आधीच सांगावे, कोणत्याही मुलाचा अशा प्रकारे अपमान करू नका’.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bride refused to marry groom infront of her family video went viral watch srk