लग्न हा प्रत्येकासाठी खास दिवस असतो. या दिवसाची वाट प्रत्येकजण पाहत असतो. काहीजण आधी प्रेमात पडतात आणि त्याच जोडीदारासोबत लग्न करतात. मात्र, काहीजणांचे हे नाते लग्नाआधीच तुटते. मुलगा किंवा मुलगी यांच्यापैकी एकाने केलेली फसवणूक नाते संपुष्टात आणते. त्यानंतर या गोष्टीचा राग ठेवून मुलगा किंवा मुलगी बदला घेण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करतात. या वधूबाबतही असेच झाले. एका नववधूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती लग्नानंतर तिच्या एक्स बॉयफ़्रेंडसाठी गाणे गाताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे हे गाणे ती तिच्या भावी पतीसमोर गाताना दिसत आहे. यादरम्यान वराने दिलेली प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हिडिओ यूट्यूबवर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ती मुलगी वधूचा पोशाख घालून बसली आहे आणि तिला तिच्या एक्स बॉयफ़्रेंडसाठी गाणं म्हणायच आहे. जेव्हा तिला तिच्या एक्स बॉयफ़्रेंडचे नाव विचारले जाते तेव्हा ती म्हणते, “मी एक्सचे नाव घेऊ शकत नाही, तो बदनाम होईल.” यानंतर मुलीला विचारले जाते की ती कोणते गाणे गाणार आहे, त्यावर ती म्हणते, “जिती थि जिसके लिये”. यानंतर मुलगी माईक घेऊन गाणे म्हणू लागते आणि जवळ उभा असलेला नवरा तिच्याकडे बघतच राहतो.

(हे ही वाचा: अरेरे काय ही रस्त्यांची दुर्दशा! सरकारी अधिकाऱ्यांसमोरच भलमोठ्या खड्ड्यात उलटली रिक्षा, व्हिडीओ होतोय Viral)

व्हिडिओ येथे पाहा

( हे ही वाचा: Viral Video: पैसे घेऊन पिझ्झा घ्यायला आलेल्या चिंपाझीला पाहून डिलिव्हरी बॉय पडला बुचकळ्यात! पुढे असं काही घडलं की…)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “असे गाणे ऐकून कोणताही मुलगा पळून जाईल”. तर दुसर्‍या यूजरने लिहिले की, “वराची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. मला वराबद्दल खूपच वाईट वाटते”. व्हिडीओमध्ये तरुणी असेही म्हणताना दिसत आहे की, तिने हे लग्न आपल्या प्रियकराला जळवण्यासाठीच केले आहे. त्याचवेळी ती ज्या पद्धतीने हे गाणे रडत रडत गात आहे पाहण्यासारखे आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bride sing a song for her ex boyfriend in marriage hall groom in shock reaction goes viral in social media gps