Bride Viral Video: लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. लग्न प्रत्येकासाठीच खूप खास असतं. आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही और असते. लग्नसोहळ्यातील काही विशेष क्षण अनेकांच्या कायम लक्षात राहतात.
लग्नात नेहमीच गडबड असते. सगळ्या गोष्टी वेळेवर व्हाव्यात याची जास्त काळजी घ्यावी लागते. लग्नाच्या सगळ्या विधी, पाहुणेमंडळींची भेट या सगळ्यामध्ये नवरी अगदी थकून जाते. आणि या सगळ्यात जर काही विचित्र प्रकार घडला तर तिची चिडचिड होणं अगदी साहजिकच आहे. सध्या असाच प्रकार एका ठिकाणी घडलाय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नव्या नवरीने स्टेजवरच एका मुलाच्या कानाखाली मारली. नेमकं काय घडलं जाणून घेऊ या…
लग्नात नवरीने मुलाच्या कानाखाली मारलं अन्… (Bride Slaps Boy)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कपाळावर हात माराल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक भव्य लग्नसोहळा सुरू आहे. या लग्नसोहळ्यात स्टेजवर नववधू आपल्या गडबडीत आहे. आणि तेवढ्यात एक मुलगा स्टेजवर येतो. तिची वरमाला नीट करतो आणि तिच्या पोटाला हात लावतो. त्याचा हा प्रकार पाहून नवरी भडकते आणि त्या मुलाला जोरदार कानाखालीच मारते. कानाखाली मारताच मुलगा थेट खालीच कोसळतो.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या @smile_please_1956 इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हडीओला तब्बल १ मिलियन व्ह्युज आले आहेत. दरम्यान, हा प्रकार नेमका कुठे घडलाय हे अद्याप कळू नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “एक कानाखाली मारली आणि त्याला गायबच केलं नवरीने” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं,”या व्हिडीओने पागलंच केलं राव” तर एकजण कमेंट करत म्हणाला, “काय विचित्र मुलगा आहे राव” एकाने “एकतर तिला नवरा आवडला नाहीय आणि त्यात याची मस्ती सुरू आहे” अशी कमेंट केली.