लग्नाचा विधी म्हटलं की वधूवरांसह कुटुंबीयांची धावपळ असते. प्रत्येक गोष्टींकडे नजर ठेवावी लागते. शुभ कार्यात कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. नातेवाईकांना हवं नको ते पाहावं लागतं. तसेच नातेवाईकांचा रुसवाफुगवा दूर करताना वेळ खर्ची घालावा लागतो. त्यामुळे अति धावपळ केल्याने थकवा येणं सहाजिकच आहे. त्यात उत्तर भारतात लग्नाचा विधी रात्री असतो. त्यामुळे या विधी दरम्यान वधूवरांना थकवा येणं सहाजिकच आहे. सध्या एका नववधूचा तिच्या लग्नात झोपलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वधू लग्नाच्या विधीदरम्यान झोपलेली दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वधू लग्नाच्या विधीदरम्यान झोपलेली दिसत आहे. यामागे दीर्घकाळ चालणारे लग्नाचे विधीही कारणीभूत आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सकाळी साडेसहा वाजले आहेत आणि लग्न अजूनही सुरू आहे. त्यामुळे वधू झोपली आहे. व्हिडीओमध्ये वऱ्हाडी तिच्या बाजूला उभे आहेत. तर वधू सोफ्यावर बसून डुलकी घेत आहे.
बेटर्ड सूटकेस नावाच्या युजरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ वधूच्या मैत्रिणींनी रेकॉर्ड केला आहे. वधूला हे देखील माहित नव्हते की, आपण झोपल्याचा व्हिडिओ मैत्रिणींनी रेकॉर्ड केली आहे. लग्न विधीदरम्यान झोपलेल्या वधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला असून मजेशीर कमेंट्स लिहील्या अनेक जण विविध प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करत आहेत.