Bride Viral Video: सध्या लग्नाचा सीझन आहे. दर आठवड्याला मित्रमंडळी किंवा नातेवाईक यांच्यापैकी एखादी व्यक्ती तरी लग्न करत असल्याचे आपल्या कानावर येत असते. बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या मंडपापर्यंत नवरदेव हा घोड्यावर बसून येत असतो. फार पूर्वीपासून सुरु असलेली ही परंपरा आजही पाहायला मिळते. मंडपामध्ये घेतलेली एंट्री लोकांच्या लक्षात राहावी असे प्रत्येक वराला वाटत असते. यासाठी तो प्रयत्न देखील करत असतो. लग्नामध्ये घोड्याच्या ऐवजी बुलेटवरुन किंवा महागड्या गाडीत बसून आलेला नवरदेव तुम्ही पाहिला असेल. पण जर नवरीने लग्नमंडपामध्ये ग्रॅन्ड एंट्री घ्यायचं ठरवलं तर? सोशल मीडियावर एका नववधूचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये ही नवरीमुलगी गाडीच्या बोनेटवर बसल्याचे पाहायला मिळते.
हा व्हिडीओ उत्तरप्रदेशमधील प्रयागराज शहरातला आहे असे म्हटले जात आहे. यामध्ये नववधूच्या वेशात असलेली तरुणी महागड्या गाडीच्या बोनेटवर आपला घागरा पसरवून थाटात बसल्याचे पाहायला मिळते. व्हिडीओमध्ये लग्नातील गाणं वाजत आहे. तसेच रस्त्यावरुन येणारे-जाणारे लोक त्या मुलीकडे आश्चर्यचकीत होऊन पाहत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. त्या गाडीच्या समोर एक कॅमेरामॅन देखील आहे. रस्त्यावर चालत्या गाडीच्या बोनेटवर बसल्यामुळे पोलीसांनी त्या मुलीला १५,५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या मुलीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीचे नाव वर्णिका चौधरी असे आहे.
आणखी वाचा – गाण्याच्या तालावर मांजरीने केला Belly Dance; पोट धरुन हसायला लावणारा व्हिडीओ पाहिलात का?
@sachkadwahai या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला ८८,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ बऱ्याच लोकांनी लाइक केला आहे. नेटकऱ्यांनी व्हिडीओवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. काहीजणांनी गाडीच्या बोनेटवर बसल्याने त्या मुलीवर टीका केली आहे. तर काही यूजर्स हा व्हिडीओ ब्यूटी पार्लरचे प्रमोशन करण्यासाठी बनवण्यात आला आहे असे म्हटले आहे. प्रमोशनच्या मुद्दावरुन एका यूजरने ‘प्रमोशन करताना पोलिसांनी पकडल्यांनी ब्यूटी पार्लरवाल्यांना दंड भरावा लागला’ अशी कमेंट केली आहे.