सोशल मीडियावर सध्या एका नवरीची तुफान चर्चा सुरू आहे. या नवरीच्या एका कृतीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ही नवरी तिच्या लग्नाच्या दिवशी लग्न मंडपात न जाता एका वेगळ्याच ठिकाणी गेली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण या तरुणीचे कौतुक करत आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी कारमध्ये नववधूच्या वेशात बसलेली दिसत आहे. तिला पाहून ती लग्नाच्या ठिकाणी जात असल्याचं दिसत आहे. पण पुढे काही वेगळंच घडतं. ही तरुणी लग्न मंडपात न जाता थेट कॉलेजमध्ये जाते. तरुणी लग्नापूर्वी प्रात्यक्षिक परीक्षेला बसलेली दिसत आहे. खर तर ही तरुणी मेडिकल कॉलेजमध्ये शिकवते, जी तिच्या लग्नाच्या दिवशी प्रॅक्टिकल असताना सर्वात आधी परीक्षा केंद्रावर पोहोचते. जे पाहून सर्वजण थक्क होतात.
येथे पाहा व्हिडिओ
( हे ही वाचा: १२ कोटींची लॉटरी लागताच ‘तो’ बायकोला विसरला; त्यानंतर बायकोने जे केले ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल)
नवरीची ही कृती पाहून सगळेच थक्क झाले असून हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड धुमाकूळ घालत असून व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंट येत आहेत. grus_girls नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.