Shocking video: माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे. निसर्गाने व्यापलेले विश्‍व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की, निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे. कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला, तरीही कधी तरी त्या गर्वाचे घर खाली होते. निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो. तो निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचे प्रत्यंतर येते. एकदा निसर्ग कोपला की, त्याच्या पुढे मानवाचे काही चालत नाही. आपण अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच वाचत असतो. सध्या सोशल मीडियावर हेच दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल. या व्हिडीओतून वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एका सेकंदाचीही काय किंमत असते हे कळेल.

“आयुष्यात एका सेकंदाचं महत्त्व काय?”

१७ सेकंदांचा हा व्हिडीओ खूपच भयानक आहे. ज्यामध्ये निसर्गाचे भयानक रूप पाहायला मिळते. व्हिडीओमध्ये दिसत आहे- पाऊस पडत आहे आणि जोरदार वादळ आले आहे. वारे जोरात वाहत आहेत, नदीला मोठा पूर आला आहे. यावेळी नदीवरचा पूलही अर्धा वाहून गेला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी या धोकादायक अर्ध्या वाहून गेलेल्या पुलावरूनही लोक दुसऱ्या बाजूला जात आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पुलाचा खालचा भाग पूर्णपणे पोकळ झाला असून कोणत्याही क्षणी हा पूल संपूर्ण वाहून जाण्याची शक्यता आहे. अशातही नागरिक धोका पत्करून एका बाजूनं दुसऱ्या बाजूला याच पुलावरून ये-जा करत आहेत. यावेळी एका कुटुंबानेही अशीच हिंमत केली अन् होत्याचं नव्हतं झालं. इतरांप्रमाणे हे चौघेही पळत पळत पूल ओलांडण्यासाठी गेले आणि पु्लाच्या पलीकडे जाण्यासाठी फक्त एका पावलाचं अंतर राहिलेलं असताना पूल कोसळतो आणि पुराच्या पाण्यात वाहून जातो. यामध्ये महिला, लहान मुलं वाहून जातात; तर दोन पुरुष बाजूच्या कडेला पकडून बचावतात.

दर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यानंतर काही दिवस उपाययोजना केल्या जातात. त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ राहते. दर वर्षीच्या पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावे लागते. डोंगराळ भागात दरड कोसळणे, पूल वाहून जाणे यांसारखे प्रकार पावसाळ्यात सर्रासपणे अनुभवायला मिळतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: समोरुन मृत्यू आला! एकीकडून गाईची धडक दुसरीकडे भरधाव बसची धडक, पण चूक नक्की कुणाची?

एका सेकंदाचं महत्त्व काय आहे हे या व्हिडीओतून दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. आपलं मरण आपल्या हातात नसतं, ते नियतीच्या हातात असतं. नशिबात असेल तर आपला कधीही मृत्यू होऊ शकतो, असं अनेक जण बोलत असतात. पण, काही जण नियती किंवा नशिबावर विश्वास ठेवत नाहीत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून हे पाहून आपल्यालाही नशिबावर विश्वास बसेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या.