पावसाळ्यात लोकांची ये-जा सुरळीत व्हावी यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. ६ सप्टेंबर रोजी या पूलाचे उद्घाटन करण्यासाठी नेतेमंडळी आले. नेत्यांनी उद्घाटनाची फीत कापताच हा नवाकोरा पूल अक्षरशः पत्त्यासारखा त्यांच्या डोळ्यादेखत कोसळला. सुरक्षा कर्मचार्‍यांनी कसंतरी या महिला अधिकाऱ्याचे प्राण वाचवले. पुलाच्या उद्घाटनासाठी आलेल्या महिला अधिकाऱ्याला उचलून उडी घेत तिचा जीव वाचवला. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर यूजर्सही चिंता व्यक्त करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ही घटना आफ्रिकन रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये उघडकीस आली आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो (DRC) मध्ये एका पुलाचे उद्घाटन करण्यासाठी काही अधिकारी आले. लाल रिबन कापण्यासाठी महिला अधिकाऱ्याने कात्री बाहेर काढताच नवाकोरा पूल कोसळला. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून लोक बांधकामाच्या दर्जाची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

आणखी वाचा : स्वावलंबी आजी! मुंबई लोकलमध्ये चॉकलेट विकून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल!

स्थानिक खामा प्रेस वृत्तसंस्थेनुसार, पावसाळ्यात स्थानिकांना नदी ओलांडण्यास मदत करण्यासाठी हा छोटा पूल बांधण्यात आला होता. पुलाच्या उद्घाटनासाठी एका पुरुष अधिकाऱ्यासह एक महिलाही आली होती. उद्घाटनाच्या वेळी हा पूल कोसळला. महिला अधिकारी पुलाच्या एका टोकाला बांधलेली लाल फित कापून उद्घाटन करण्यात येणार होतं. पण या पूलाचे उद्घाटन होण्याआधीच डोळ्यादेखत कोसळला. या उद्घाटनासाठी पुलावर आलेले नेते मंडळी थोडक्यात बचावले.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आणखी एका पाळीव कुत्र्याने घेतला चावा, लिफ्टमध्ये मुलगा कळवळत होता आणि मालक पळून गेला

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कुत्रा विरूद्ध पाणकुत्रा, पाहा कुणी मारली बाजी, हा गोंडस VIRAL VIDEO पाहून मन प्रसन्न होईल

या व्हिडीओमध्ये महिला अधिकारी मदतीसाठी जोरजोरात ओरडत असल्याचं दिसत आहे. जीव वाचवण्यासाठी ती पूलावरून उडी देखील मारायला तयार होती. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून महिलेला पडत्या पुलावरून पकडले आणि तिचा जीव वाचवला. इतर अधिकारीही मदतीची याचना करू लागले. मात्र, सुदैवाने पूल कोसळल्यानंतरही एकही अधिकारी खाली पडला नाही. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सर्वांना सुखरूप बाहेर काढले. यानंतर यूजर्स वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. एका यूजरने विनोदाने कमेंट केली की, रिबनने पुलाला बांधलं होतं कदाचित.