ब्रिटनमध्ये गुरूवारी (दि. ८) झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती आलेत. यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. पंतप्रधान थेरेसा मे यांना बहुमताची अपेक्षा होती पण त्यांच्या पारड्यात जनमत झुकताना दिसले नाही. आता यात हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष कोणीही बाजी मारो पण दोन्ही पक्षात भारतीय वंशाच्या उमेदवारांना जनतेने भरभरून मत दिल्याचं समोर आलंय.  पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या शीख महिलेने निवडणूक जिंकली आहे. प्रीत कौर गिल या शीख महिला बर्मिंगहॅम एजबस्टन येथून संसदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्यात. त्या लेबर पार्टीकडून निवडणूक लढवत होत्या. आपल्या प्रतिस्पर्धीला ६ हजार ९१७ मतांनी त्यांनी हरवलं. तेव्हा ब्रिटनच्या इतिहासात संसदेत निवडून आलेल्या पहिल्या शीख महिला ठरल्या आहेत. ज्या भागात मी लहानांची मोठी झाले त्याच मतदारसंघातून मी  निवडून आले याचा मनस्वी आनंद होतो आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली आहे.

Story img Loader