ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन केले. ब्रिटनमध्ये गेल्या २१० वर्षांतील सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेल्या सुनक यांनी मंगळवारी राजे चार्ल्स तृतीय यांची भेट घेऊन पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर सुनक यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होणार हे सोमवारी स्पष्ट झाल्यापासूनच भारतामध्येही आनंदनाचं वातावरण आहे. सुनक हे भारतीय वंशाचे असून दीड महिन्यापूर्वी झालेल्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीमध्येही भारतीय प्रसारमाध्यमांपासून ते समाजमाध्यमांपर्यंत अनेक ठिकाणी त्यांच्या भारतीय कनेक्शनची चर्चा होती.
नक्की पाहा हे Photos >> “तिच्या शेजारी बसता यावं म्हणून मी…”; ऋषी सुनक यांनीच सांगितली अक्षता मूर्तींबरोबरची लव्ह स्टोरी! MBA च्या लेक्चरला…
सुनक पंतप्रधान झाल्यानंतर आता पुन्हा एकदा ब्रिटनकडे असलेल्या कोहिनूर हिऱ्यासंदर्भातील चर्चा समाजमाध्यमांवर सुरु झाली आहे. त्यातच सुनक पंतप्रधान झाल्याने आता पुन्हा भारताने हा जगातील सर्वात मौल्यवान हिरा असलेला कोहिनूर परत आणण्यासाठी हलचाली कराव्यात असं म्हटलं जात आहे. या चर्चा सुरु असताना एका भारतीय उद्योगपतीने तर थेट कोहिनूर परत आणण्यासाठी सुनक यांचं अपहरण करण्याचा सल्ला दिला आहे.
उद्योगपती हर्ष गोयंका हे त्यांच्या मजेदार आणि तितक्याच वैशिष्ट्यपूर्ण ट्विट्ससाठी चर्चेत असतात. अगदी सणासुदीपासून ते राजकीय, आर्थिक घडामोडींवर गोयंका हे उपहासात्मक आणि मजेदार पोस्ट करत असतात. कधी इमेजच्या माध्यमातून तर कधी टोमण्यांच्या माध्यमातून ते परिस्थितीवर मार्मिक भाष्य करताना दिसतात. अनेकदा त्यांनी पोस्ट केलेल्या मेजदार ट्वीट्स व्हायरल होतात. सध्या त्याचं असं एक ट्वीट व्हायरल झाला आहे. ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर काही वेळाने गोयंका यांनी केलेल्या ट्वीटमध्ये आता सुनक पंतप्रधान झाले आहेत तर कोहिनूर कसा परत आणता येईल याबद्दलची माहिती चार स्टेप्समध्ये दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे पाहूयात…
माझ्या मित्राने कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी सांगितलेली कल्पना :
१) ऋषी सुनक यांना भारतामध्ये आमंत्रित करा.
२) बंगळुरुच्या वाहतूक कोडींमधून त्यांचं अपहरण करा जेव्हा ते त्याच्या सासरच्या मंडळींना भेटायला जात असतील.
३) त्यांच्याऐवजी आशिष नेहराला युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान म्हणून परत पाठवा. कोणालाही याची भनक लागणार नाही.
४) नेहराला कोहिनूर परत करण्यासंदर्भातील कायदा संमत करण्यास सांगून पाठवूयात.
कोहिनूर भारतात परत येईल.
नक्की वाचा >> Britain PM Rishi Sunak: ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं ‘मराठी कनेक्शन’ ठाऊक आहे का? पुणे, कोल्हापूर, मुंबईशी खास नातं
सुनक हे भारतीय वंशाचे असून त्यांची पत्नी अक्षता या ‘इन्फोसिस’चे सह-संस्थापक नारायण मूर्तींच्या कन्या आहेत. कॅलिफोर्नियातील ‘एमबीए’साठी स्टॅनफोर्ड येथे असताना इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यानंतर २००९ मध्ये सुनक यांनी अक्षतासोबत विवाह केला. सुनक यांच्या सासरवाडीच्या याच कनेक्शनचा अप्रत्यक्ष संदर्भ गोयंका यांनी दुसऱ्या मुद्द्यात दिला आहे. बंगळुरुमधील वाहतूक कोंडी हा इंटरनेटवर कायमच चर्चेचा विषय असतो. तर सुनक यांच्याप्रमाणे चेहऱ्याची ठेवण असणारा भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराही ब्रिटनमधील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहे. त्याची सांगडही गोयंका यांनी तिसऱ्या आणि चौथ्या मुद्द्यात घातली आहे.
गोयंका यांच्या या ट्वीटला काही तासांमध्ये जवळजवळ ३० हजार लाइक्स मिळाले आहेत.