काही वर्षांपूर्वी याच ब्रिटिशांनी भारतीयांना आपल्या तालावर नाचवले, आता तेच भारतीय गाण्यांवर ठेका धरत आहेत. आहे की नाही कमाल. ‘महेंद्रा अँड महेंद्रा’ कंपनीचे व्यवस्थापकीय संपादक आनंद महेंद्रा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होण्यास कारणही आहे म्हणा, तीन ब्रिटिश आजी चक्क पंजबी गाण्यावर भांगडा करत होत्या आणि एरव्ही भारतीयांच्या नावाचा उद्धार करणारे हेच ब्रिटिश लोक या भांगडाचा  मनमुराद आनंद घेत होते.

या तिन्ही आजी ६० वर्षांच्या आसपास आहेत. स्कर्ट, टॉप आणि शूजवर पंजाबी गाण्यावर भांगडा करताना दिसत आहेत, वयाच्या मनाने त्यांचा उत्साहही भल्या भल्यांना लाजवेल असाच होता. जमलेली सगळी मंडळी या तिन्ही आजींचा भांगडा छान एन्जॉय करत होते. फिझॉक प्रोडक्शन कंपनीसाठी या आजी भांगडा करत होत्या. इथल्या पंजाब्यांचे माहित नाही पण इंग्लडमध्ये मात्र आपल्या भांगडाने या तिन्ही आजींनी सगळ्यांना वेड लावले.

Story img Loader