फॅशनच्या जगामध्ये क्रिएटिव्हीटीला दुष्काळ नाही. मध्यमवर्गीयांना आश्चर्य वाटले, इतक्या प्रकारच्या स्टाइल फॅशन जगतात येत असतात. जॉर्डनलुका नावाच्या ब्रँडने एक जीन्स पँट बाजारात आणली आहे, ज्यावरून इंटरनेटवर उलटसुलट चर्चा सुरू आहे. जॉर्डन बोवन आणि लुका मार्चेटो या दोघांनी मिळून जॉर्डनलुका नावाचा ब्रँड तयार केला आहे. या ब्रँडने नुकतीच एक जीन्स लाँच केली, ज्यावर आता चर्चा होत आहे. या जीन्सच्या पुढच्या भागावर मांड्याच्या वर भिजल्याचा डाग दिसतो. हा डाग लघवीप्रमाणे दिसत असल्यामुळे अनेकजण या पँटची खिल्ली उडवत आहेत. पण जेव्हा या जीन्सची किंमत ऐकाल, तेव्हा तुम्हाला धक्का बसेल.

या जीन्सची मूळ किंमत ८११ डॉलर एवढी आहे. भारतीय रुपयांमध्ये ६७ हजारांच्या आसपास किंमत जाते. आता ब्रँडने या जीन्सचे लाइटर वॉश व्हर्जन बाजारात आणले असून त्याची किंमत ६०८ डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ५० हजार इतकी आहे.

तुमच्या शरीराच्या आकारानुसार योग्य जीन्स कशी निवडावी? जाणून घ्या टिप्स

सामान्यपणे कोणतीही फॅशन असली तरी समाजातील एक वर्ग लगेचच ती उचलून धरण्यात पुढे असतो. पण या जीन्सच्या बाबतीत असे होताना दिसत नाही. सोशल मीडियावर अनेकजण या पँटच्या स्टाईलची खिल्ली उडवत आहेत.

हिंदुस्तान टाइम्सने काही लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरून गोळा केल्या आहेत. त्यापैकी एक व्यक्ती म्हणतो, “लघवीचे डाग असलेली पँट लेटेस्ट फॅशन असल्याचे दाखवून आपण नेमकं कुठे चाललो आहोत?” दुसरा एक व्यक्ती म्हणाला, “ही पँट दुरून पाहिल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या मनात काय येतं?”

Jeans Washing Tips : जीन्स धुताना करू नका ‘या’ चार चुका; अन्यथा कपड्यांची चमक होईल कमी

आणखी एक व्यक्ती म्हणाला, “अशी विचित्र फॅशन असलेली पँट कोण आणि कशाला विकत घेईल?” तर एका जणाने गंमत करत म्हटले की, एवढी महाग पँट घेण्यापेक्षा एखाद्याने त्याची पँट अशा पद्धतीने ओली करावी. म्हणजे फॅशनही होईल.

जीन्सची विचित्र फॅशन येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा विचित्र अशा जीन्स बाजारात आलेल्या आहेत. मध्यंतरी एक विचित्र जीन्स बाजारात आली होती. त्याचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.

फाटलेली जीन्स कशी तयार केली जाते? जीन्सचा सर्वाधिक लोकप्रिय ट्रेंड; व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हिडीओमध्ये जी जीन्स दिसते ते पाहूनच स्पष्ट होते की अत्यंत छोटी आहे. जीन्सचे बक्कल आणि बेल्ट लावता येईल एवढीच जीन्स आहे. ही जीन्स सुरू झाल्यावर लगेच संपते. या विचित्र जीन्सलाही लोकांनी चांगलेच ट्रोल केले होते.