Neil Parish MP: संसद भवनात पॉर्न पाहिल्याच्या आरोपानंतर यूकेच्या एका खासदाराला राजीनामा द्यावा लागला. नील पॅरिश (Neil Parish) असे राजीनामा देणाऱ्या खासदाराचे नाव असून ते पंतप्रधान बोरिस जॉन्सन (boris johnson) यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य आहेत. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये दोनदा पॉर्नोग्राफी (porn)पाहिल्याची कबुली दिल्यानंतर नील पॅरीश यांनी खासदारपदाचा राजीनामा देत असल्याचे उघड केले आहे. नील पॅरिश हे यूकेच्या टिव्हर्टन आणि हॉनिटनमधून खासदार म्हणून निवडून आले. राजीनामा जाहीर केल्यानंतर ते म्हणाले की, “हा माझा वेडेपणा होता आणि मी जे केले त्याचा मला गर्व नाही.”
महिला खासदारांनी केली होती तक्रार
त्यांनी सांगितले की, ट्रॅक्टरची वेबसाईट पाहताना अचानक पॉर्न क्लिक झाले, पण दुसऱ्यांदा मी हे जाणूनबुजून केले. या आरोपांवरून कंझर्व्हेटिव्ह पक्षाने शुक्रवारी त्यांना निलंबित केले. दोन महिला सहाय्यकांनी दावा केला की त्यांनी खासदार नील पॅरिश यांना त्यांच्या फोनवर प्रौढ कंटेंट पाहताना पकडले आहे.
(हे ही वाचा: हा इम्रान खान आहे का? ‘जाने तू या…जाने ना’ अभिनेत्याला ओळखणंही झालं कठीण!)
कोण आहेत खासदार नील पॅरिश?
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मी ट्रॅक्टरची वेबसाइट तपासत आहे. यादरम्यान त्याच नावाची एक वेबसाइट आली. त्यानंतर मी काही काळ ही वेबसाइट पाहिली जे मला करायला नको होती. ते म्हणाले पण माझा सर्वात मोठा गुन्हा म्हणजे मी दुसऱ्यांदा त्या वेबसाईटवर गेलो. दुसऱ्यांदा मी हे जाणूनबुजून केल्याचेही त्यांनी सांगितले. मी चुकीचा होतो, मी मूर्ख होतो.
(हे ही वाचा: ‘सामी-सामी’ गाण्यावर आजीने केला जबरदस्त डान्स! व्हिडीओ सोशल मीडियावर viral)
मागितली जाहीर माफी
मी पूर्णपणे माफी मागतो असे ते म्हणाले. “मी पूर्णपणे माफी मागतो. माझा हेतू घाबरवण्याचा-धमकावण्याचा नव्हता.” नील पॅरीश यांनी रात्री सांगितले की, जोपर्यंत त्याच्या वर्तनाची चौकशी होत नाही तोपर्यंत ते खासदार राहतील. पण प्रचंड दबावाखाली त्यांनी रातोरात आपला निर्णय बदलला. त्यांच्या राजीनाम्यानंतर टिव्हरटन आणि हॉनिटन संसदीय जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
(हे ही वाचा: वडिलांनी लग्नासाठी पाठवलेल्या मुलाला मुलीने दिली ‘ही’ खास ऑफर; चॅटची होतेय सर्वत्र चर्चा)
नील पॅरीश कोण आहे?
नील पॅरिश हे ब्रिटिश कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ६५ वर्षीय परिष २०१० पासून सतत खासदार आहेत. १९९९ ते २००९ पर्यंत ते दक्षिण पश्चिम इंग्लंडमधून युरोपियन संसदेचे सदस्य होते. आपल्या कुटुंबाची शेती सांभाळण्यासाठी त्याने वयाच्या १६ व्या वर्षी शाळा सोडली. २००० मध्ये, झिम्बाब्वेच्या संसदीय निवडणुकीत त्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.