Accent And Expressions Challenge : आपल्या देशात टॅलेंट एकदम ठासून भरलेली लोकं मोठ्या प्रमाणात आहेत हे आपण जाणतोच. या टॅलेंटेड लोकांना आता सोशल मीडियाच्या रूपाने हक्काचं व्यासपीठ मिळू लागलं आहे. बरं यात विविध प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असल्याने एका नाही तर दुसऱ्या प्लॅटफॉर्मचा वापर करत जगाच्या कानाकोपऱ्यात यामुळे पोहोचता येतं. सध्या एक असंच भन्नाट टॅलेंट असलेल्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये महिला केवळ एका मिनीटात तब्बल दहा वेगवेगळे एक्सप्रेशन्स आणि अ‍ॅक्सेंटमध्ये बोलताना दिसतेय. महिलेचं हे टॅलेंट पाहून सारेज जण अचंबित होत आहेत. केवळ एका मिनिटात इतके बदल करणं या महिलेला कसं काय जमलं, असाच प्रश्न सारे जण विचारताना दिसत आहेत.

एखादी नवी भाषा शिकायची म्हटलं अनेकजण वर्षोनवर्षे भाषेवर अभ्यास करतात, मेहनत घेतात. तरी सुद्धा काहींना नवी भाषा परफेक्ट बोलता येत नाही. पण हे अशक्य काम या व्हायरल व्हिडीओमधल्या महिलेने शक्य करून दाखवलंय. ते ही एकटी दुकटी भाषा नव्हे तर तब्बल १० वेगवेगळ्या भाषा, त्या-त्या देशातील लोकांच्या हावभावानुसार ते ही एका मिनिटात. हे ऐकून सुरूवातीला तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरंय.

आणखी वाचा : बापरे! गेट उघडायला थोडा उशीर झाला तर महिलेने गार्डला मारहाण आणि शिवीगाळ केली, पाहा VIRAL VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी एकामागून एक वेगवेगळ्या अ‍ॅक्सेंटमध्ये बोलत आहे आणि एका मिनिटात काही सेलिब्रिटींचे एक्सप्रेशनही दाखवताना दिसत आहे. ब्रिटीश ते स्पॅनिश आणि एरियाना ग्रांडे ते शकीरा पर्यंत ही महिला वेगवेगळ्या उच्चारांमध्ये प्रत्येकाची नक्कल करताना व्हिडीओमध्ये दिसते. ही महिला तिच्या अनोख्या टॅलेंटने सर्वांची मने जिंकत आहे. सई गोडबोले असं या महिलेचं नाव आहे. तिच्या या अनोख्या टॅलेंटचा व्हिडीओ बनवत तिने तो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला. सोशल मीडियावर सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या ‘अ‍ॅक्सेंट आणि एक्स्प्रेशन्स चॅलेंज’ स्विकारत तिने हा व्हिडीओ शेअर केला. पण त्यानंतर तो बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला.

आणखी वाचा : या पोराची बॉलिंग पाहून थक्क व्हाल! तुम्ही जर गल्ली क्रिकेट खेळला असला तर हा VIRAL VIDEO पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL : दहीहंडी फोडण्यासाठी मद्यधुंद व्यक्ती ८० फूट उंचावर चढला आणि ५५ हजार रूपयांचं बक्षिस मागू लागला

हा व्हिडीओ तिने ९ ऑगस्ट रोजी शेअर केला होता. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १.३ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच हजारो लोकांनी या व्हिडीओला लाइक करत आश्चर्य व्यक्त केलंय. या व्हिडीओमध्ये दिसणार्‍या सईच्या टॅलेंटने प्रभावित होऊन एका युजरने लिहिले की, “मी नुकतेच जे पाहिले! तुम्ही आश्चर्यकारक आहात.” दुसर्‍या युजरने लिहिले की, “अगदी मनाला आनंद देणारा! तू खूप टॅलेंटेड आहेस.”

Story img Loader