सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असणे हे कोणत्याही शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असते विशेषत: असे शहर जिथे लाखो लोक रोजगार आणि शिक्षणासाठी रोज प्रवास करतात. वाढत्या प्रवाशांच्या संख्या पाहता उपलब्ध बसची संख्या मात्र अत्यंत कमी आहे परिणामी प्रवाशांना आहे त्याच बसमध्ये प्रचंड गर्दीमध्ये प्रवास करावा लागतो. बसने प्रवास करताना जागा मिळेल अशी अपेक्षाही आजकाल कोणी करत नाही पण किमान उभे राहण्यासाठी थोडी जागा मिळावी एवढीच काय ती अपेक्षा आजकालच्या प्रवाशांची असते. प्रवाशांना ती देखील मिळत नाही. दरम्यान आता बसमध्ये चढण्यासाठी चांगल्या पायऱ्या देखील मिळत नाहीये अशा अवस्था बसची झाली आहे. सध्या सोशल मीडियावर तुटलेल्या बसच्या पायऱ्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहून काळजात धडकी भरते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बसच्या तुटल्या पायऱ्या

इंस्टाग्रामवर coastal_diaries_नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ कर्नाटकमधील कारकाला उडपी येथील असल्याचे समजते. कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (KSRTC) बसची कशी दुरावस्था झाली आहे हे या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. बसमध्ये चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी पायऱ्या अत्यंत गरजेच्या असतात जेणेकरून सहज चढ-उतर करता येईल आणि कोणताही अपघात होणार नाही. पण येथे बसच्या पायऱ्या चक्क तुटलेल्या आहेत आणि अशी दुरावस्था असूनही ही बस प्रवाशांची ने-आण करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये प्रवासी अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे. चुकून जरी एखाद्याचा पाय सटकला तर मोठा अपघात होऊ शकतो. व्हिडिओ पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की बसच्या पायऱ्या तुटलेल्या असूनही प्रवासी त्यात चढले कसे?

हेही वाचा – “तांबडी चामडी चमकते उन्हात लका लका…!”, नऊवारी नेसून तरुणींनी सादर केले अफलातून नृत्य; Viral Video एकदा बघाच

येथे पाहा व्हिडीओ

व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे आणि प्रशासनाच्या कामकाजाची पोलखोल देखील झाली आहे. प्रवाशांना कशा प्रकारे नाहक त्रास सहन करत प्रवास करावा लागतो आहे हे स्पष्टपणे दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “उडपी ते कारकाला KSRTCबसमध्ये चढण्यासाठी पायऱ्याच नाही”

एकाने कमेंट करत सांगितले की,” उडुपी , मंगलोरपर्यंत चांगल्या किंवा नवीन KSRTC बसेस मिळणार नाहीत. त्या फक्त गौडा लँड(Gowdaland) बायलुसेमीसाठी उपलब्ध आहेत.

हेही वाचा – मुंबईतील फूड डिलिव्हरी बॉय बनला फॅशन शोमध्ये मॉडेल! पाहा त्याच्या प्रेरणादायी प्रवासाचा Video

दुसरा म्हणाला, “एखादा विद्यार्थी तेथे उभा असेल तर काय होईल”

व्हिडीओवर कमेंट करत काहींनी ही KRSTC बस नसून खासगी बस असल्याा दावा केला आहे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Broken footboard on the udupi to karkala ksrtc bus how to board the bus watch viral video snk