Emotional video: सगळ्या नात्यांमध्ये अगदी वेगळं नातं कोणाचं असेल, तर ते भाऊ- बहिणीचं! ते दोघे एकमेकांशी भांड भांड भांडतील; पण त्या दोघांतल्या प्रेमाला कधीच ओहोटी लागत नाही. त्यांचं एकमेकांशी कधीच पटणार नाही; पण त्या दोघांच्याही मनात सातत्याने एकमेकांबद्दल मायेचा ओलावा पाझरत असतो. म्हणूनच जेव्हा लग्न करून बहीण दुसऱ्याच्या घरी जाते तेव्हा प्रत्येक भावाच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. लहान भाऊ म्हणून मोठ्या बहिणीसोबत राहणं जरी चांगलं असलं तरी त्यापेक्षा जास्त भारी असते ते मोठा भाऊ बनून लहान बहिणीला सांभाळणे. ज्यांना लहान बहीण असते त्यांना इतर कोणत्या मैत्रिणीचीही गरज भासत नाही. दरम्यान, भाऊ-बहिणीचं प्रेम दाखविणारा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तुम्हीही याआधी भावा-बहिणीची अशी जुगलबंदी कधी पाहिली नसेल.

आपल्या देशात अनेक पारंपारिक नृत्ये प्रसिद्ध आहे. जर महाराष्ट्राचा विचार केला तरी जिल्हा किंवा विभागानुसार वेगवेगळी परंपरा पाहायला मिळते.प्रत्येक जिल्हा किंवा विभागातील जेवण, भाषा आणि नृत्यकलामध्ये वेगळेपण दिसून येते. महाराष्ट्रात खानदेश हा एक प्रदेश आहे. येथील खानदेशी जेवण आणि खानदेशी नृत्य विशेष प्रसिद्ध आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भाऊ-बहिण “देख तुनी बायको कशी नाची रायनी कशी कुदी रायनी कशी डोली रायनी” या खानदेशी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. दोघांचीही जुगलबंदी पाहून सगळे थक्क झाले आहेत.

बहिण- भावाचं नातं कायमच अनोख असतं. कधी मस्ती तर कधी भाडणं. मात्र आयुष्यभर बहिणीसाठी भांडणारा भाऊ मात्र बहिणीच्या लग्नात अतिशय भावूक होतो. मग लग्नातील प्रत्येक कार्यात सर्वांपेक्षा अधिक उत्साही दिसतो. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये या भावानं आपल्या बहिणीच्या लग्नात वडिलांची जागा घेत तिच्या सोबत उभा राहिला आहे.वडिलांची जागा आयुष्यात कुणीही घेऊ शकत नाही असं म्हणतात मात्र वडिलानंतर एक भाऊच असतो जो वडिलांप्रमाणे बहिणीला जीव लावतो. बहिण भावाचं नातं कसं असतं हे या व्हिडीओतून पाहायला मिळालं.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ sakshisalve_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत भावा-बहिणीचं कौतुक करत आहेत.

Story img Loader