Viral Video : नुकताच देशात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. रक्षाबंधन हा बहीण भावाचा सण आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिच्या रक्षण करण्याचे वचन देतो. बहीण भावाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. बहीण भाऊ एकमेकांबरोबर खूप भांडतात पण ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही.
सध्या असाच एक बहीण भावाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बहीण भाऊ थेट रक्षाबंधनाच्या दिवशी भांडताना दिसतात. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या बहीण भावाची आठवण येईल. काही लोकांना त्यांचे लहानपणीचे दिवस आठवतील. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Brother and sister fight on Raksha Bandhan day sister pulled Brothers hair because he was not allowed to tie Rakhi)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की बहीण भावाला राखी बांधत आहे. राखी बांधण्यासाठी बहीण हातात राखी पकडते आणि भावाला हात पुढे करण्यास सांगते पण भाऊ हात मागे घेतो आणि राखी बांधू देत नाही तेव्हा बहीणीला राग येतो आणि ती थेट भावाचे केस ओढते. या व्हिडीओवर लिहिलेय, “कसा मार खाल्ला बहिणीचा, आधी ऐकत जा बहिणीचं” बहीण भावाचा हा भांडणाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : पुणे शहराचा सुंदर View पाहण्यासाठी या ठिकाणी कधी गेला का? VIDEO होतोय व्हायरल
shital_khillari या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बहिणीच ऐकत जा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हीच खरी रक्षाबंधन?” तर एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात खरी रक्षांबंधन. बाकी सगळी मोहमाया आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “दीदीचा मार खायला नशिबच लागते” एक युजर लिहितो, “देव पण समजू शकत नाही भाऊ बहिणीचे प्रेम” तर दुसरा युजर लिहितो, “आठवले जुने दिवस” अनेक युजर्सनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या बहीण भावाची आठवण आली आहे.