जगातील सर्वात प्रेमळ आणि प्रामाणिक नातं हे भाऊ-बहिणीचं असतं, असं म्हटलं जातं. अनेकवेळा भाऊ-बहिणीमध्ये किरकोळ वाद होत असतात. मात्र, ज्यावेळी दोघांपैकी एक संकटात असतो त्याच्या मदतीसाठी ते धावूनही जात असतात. सध्या अशाच एका भाऊ-बहिणीमधील प्रेमाचा जिव्हाळा दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओतील बहिण भावामधील जिव्हाळा पाहून तुमचेही डोळे भरुन येतील यात शंका नाही.

हेही पाहा- अरे यांना आवरा रे…, डान्स करतानाच काढायला लागला खुन्नस, मित्राला उचलून फेकल्याचा Video होतोय व्हायरल

mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
an old lady enjoying Ropeway by wearing nauwari
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे! नऊवारीत मराठमोळ्या आज्जीने घेतला रोप वे चा आनंद; व्हिडीओ होतोय व्हायरल
Video of children warkari dance on bhajan songs
संस्कार याच वयात होतात! चिमुकले वारकरी थिरकले भजनाच्या तालावर, VIDEO एकदा पाहाच
Delhi CM Atishi
Video : बिधुरींच्या आक्षेपार्ह विधानानंतर वडिलांबद्दल बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, “ते इतके आजारी असतात की…”
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मोठा भाऊ लहान बहिणीला सायकलवर सुरक्षित बसवत असल्याचं दिसत आहे. त्याचे बहिणीसाठीचे प्रेम आणि तिच्या सुरक्षिततेसाठी घेतलेली काळजी स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडीओत दिसणारे हे लहान बहिण भाऊ गरीब कुटुंबातील असल्याच दिसत आहेत. ते दोघे सायकलवरुन बाहेर कुठेतरी निघाले असताना, आपल्या बहिणीचा पाय सायकलच्या चाकात जाऊ नये आणि ती सायकलवरुन खाली पडू नये. यासाठी तिचा भाऊ अत्यंत सावधपणे बहिणीची काळजी घेताना व्हिडीओत दिसतं आहे.

हेही पाहा- बापरे! हायवेवर चक्क चाके नसलेला ट्रक पळवतोय ड्रायव्हर, व्हायरल Video पाहून नेटकरी झाले हैराण

बहिण भावामधील प्रेम दाखवणारा हा व्हिडिओ उर्दू नोवेल नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअक करण्यात आला आहे. २२ सेकंदांच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये एक मुलगा त्याच्या लहान बहिणीसोबत सायकलवरून प्रवास करताना दिसत आहे. बहिणीचे पाय बांधण्यासाठी त्याने एका कापडाचा तुकडा वापरल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “भावाचे प्रेम” असे लिहिलं आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केल्यापासून ते आतापर्यंत तो १४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूप भावला असून अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “किती गोड.” दुसर्‍या वापरकर्त्याने “शुद्ध बंधुप्रेम” अशी कमेंट केली. तर एका नेटकऱ्याने ‘जबाबदार आणि प्रेमळ भाऊ, देव त्यांना आशीर्वाद देवो’ अशी कमेंट केली आहे.

Story img Loader