Viral Post : गोष्टीची पुस्तके किंवा चित्रपटांमध्ये अनेक लव्ह स्टोरीचे अगदी सुंदर वर्णन केले जाते ; जे बघून प्रत्येकाला तास जोडीदार हवा अशी इच्छा अनेकांच्या मानत निर्माण होते.पण खऱ्या आयुष्यातील लव्ह स्टोरी सगळ्यांनाच आकर्षित करतात. कॉलेजचं प्रेम, शाळेतील प्रेम अशा अनेक जोडप्यांचा लग्नापर्यंतचा प्रवास बघायला आपल्यातील अनेकांना खूप आवडते. तर आज सोशल मिडीयावर सुद्धा असचं काहीसं पहायला मिळालं आहे.एक अनोखी लव्ह स्टोरी बघायला मिळाली आहे. एका भावाने त्याच्या बहिणीच्या बेस्ट फ्रेंडशी लग्न केले आहे. आणि यांची लव्ह स्टोरी सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका कुटुंबातील भाऊ बहीण आणि बहिणीच्या खास मैत्रिणीची (BestFriend) ही अनोखी गोष्ट आहे. ज्यात भाऊ जेव्हा बहिणीच्या बेस्ट फ्रेंडला पहिल्यांदा बघतो तेव्हा ती तिच्या प्रेमात पडतो आणि रात्री बहिणीला संदेश पाठवून सांगतो की, ‘मला तुझी बेस्ट फ्रेंड खूप आवडते. मी पहिल्या नजरेत तिच्या प्रेमात पडलो आहे आणि मी तिच्याशी लग्न करणार आहे’ ; असे बहिणीला सांगतो आणि तर चार वर्षांनी बहिणीच्या बेस्ट फ्रेंड आणि भावाचे लग्न होते. आणि अशा हटके पद्धतीत यांची लव्ह स्टोरी सुरु होऊन चार वर्षांनी त्यांचे लग्नसुद्धा होते.

हेही वाचा…पाय फ्रॅक्चर असूनही लाठी-काठी खेळ सादर करतायेत ‘या’ वॉरिअर आजी, व्हिडीओ होतोय व्हायरल

पोस्ट नक्की बघा :

बहिणीच्या बेस्ट फ्रेंडसोबत लग्न :

तर बहिणीने तिचा भाऊ आणि खास मैत्रिणीच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. आणि लिहिले आहे की,“आज माझा भाऊ माझ्या जिवलग मैत्रिणीशी लग्न करतोय. 4 वर्षांपूर्वी, ज्या रात्री ते पहिल्यांदा भेटले होते, त्याने मला एक संदेश पाठवला होता की तो पहिल्या नजरेत प्रेमात पडला आहे आणि आज तो तिच्याशी लग्न करणार आहे. अशा सुंदर जोडप्यासाठी मी खूप जास्त खुश आहे ” असं खास कॅप्शन लिहून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

तर सोशल मीडियावर ही लव्ह स्टोरी अनेकांच्या पसंतीस उतरते आहे. बहिणीने तिच्या @EGYPTIANA या अकाउंटवरून लव्ह स्टोरी सुरु कशी झाली याचा एक स्क्रिनशॉट आणि चार वर्षानंतर बेस्ट फ्रेंड आणि भावाच्या लग्नातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ही पोस्ट पाहून एका युजरने बहिणीच्या कुटुंबाचा हिस्सा होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच अनेकजण या जोडप्याचे कौतुक करत आहेत. आणि काहीजण ही लव्ह स्टोरी ऐकून खूप छान प्रतिक्रिया देताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत