Emotional video: सगळ्या नात्यांमध्ये अगदी वेगळं नातं कोणाचं असले तर भावा बहिणीचं! एकमेकांशी भांड भांड भांडतील पण त्यांचं प्रेम कधीच कमी होणार नाही. त्यांचं एकमेकांशी कधीच पटणार नाही पण एकमेकांबद्दल माया खूप असते. म्हणूनच जेव्हा लग्न करून बहिण दुसऱ्याच्या घरी जाते तेव्हा प्रत्येक भावाच्या डोळ्यांत पाणी आल्या शिवाय राहत नाही. लहान भाऊ म्हणून मोठ्या बहिणीसोबत राहणं जरी चांगलं असलं तरी त्यापेक्षा जास्त भारी आहे मोठा भाऊ बनून लहान बहिणीला सांभाळणे. ज्यांना लहान बहिण असते त्यांना कोणत्या मैत्रिणीची सुद्धा गरज भासत नाही. दरम्यान भावा बहिणीचं प्रेम दाखवणारा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, यामध्ये एका भावाने आपल्या बहिणीला घर बांधण्यासाठी १५ लाख रुपये दिले आहेत. यावेळी बहिणीची रिअॅक्शन पाहून तुमचेही डोळे पाणावतील.
राखी पौर्णिमा, भाऊबिजेला बहिणीच्या ओढीने तिच्या घराकडे वळणारी पावले आता हक्कासाठी कोर्टाच्या दिशेने वळू लागली आहेत. बहिणीचे थाटामाटात लग्न लावून दिले होते. तिची सासरची सांपत्तिक स्थिती चांगली आहे. तिला आता आमच्या संपत्तीत वाटा देण्याची गरज नाही, अशा भावना भावांमध्ये निर्माण होऊ लागल्या आहेत. काही वेळा माहेरच्या संपत्तीत वाटा मिळावा म्हणून पती आणि मुलाकडून होणाऱ्या जबरदस्तीमुळे महिलांना इच्छा नसताना वाटा मागावा लागतो. अर्थात काही ठिकाणी बहिणी स्वेच्छेने हक्कसोडपत्रही देतात. प्रत्येक कुटुंबात हे चित्र वेगळे आहे. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एका कुटुंबातील हे भावा बहिणींच प्रेम पाहून तुमचाही उरभरुन येईल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरात सगळ्या बहिणी आणि भाऊ त्यांची मुलं एकत्र जमली आहेत. यावेळी बहिणीला घरासाठी पैशाची मदत करण्यासाठी भावानं माहेरी बोलावलं आहे. मात्र याची तिला काहीही कल्पना नसते. त्यानंतर भाऊ तिला बोलवतो आणि तिला पंधरा लाख रुपये तुला घर बांधायला घे म्हणून सांगतो, यावेळी बहिणीला अश्रू अनावर होतात. ती अक्षरश: नको नको करते मात्र भाऊ हक्काने तिला देतो. बहिणी भावामधलं हे प्रेम पाहून कुटुंबातील सर्वांनाच अश्रू अनावर होतात. व्हिडीओ पाहताना तुमचेही डोळे भरुन येतील.
/
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “पुणेकरांचा नाद नाय” हेल्मेट सक्तीवर पुणेकर महिलेनं दिलं अजब उत्तर; VIDEO पाहून पोट धरुन हसाल एवढं नक्की
सोशल मीडियावर हा व्हिडीओ maharashtra_udyog_kranti नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “असा भाऊ प्रत्येकाला भेटत नसतो” तर आणखी एकानं म्हंटलंय की, “भावाला मिळालेले संस्कार फार मोठें आहे.”