Brother sister video: भाऊ आणि बहिणीचे नाते किती खास असते हे आपल्याला माहितच आहे. बहिण भाऊ एकमेकांसाठी जीव देतील, पण जेवताना उठून एक ग्लास पाणी मात्र कधीच देणार नाहीत. असं असलं तरी बहिणीच्या मागे कायम आधार म्हणून उभा असलेला आणि कोणत्याही प्रसंगात तिची काळजी घेणाऱ्या भावाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. बहिणही प्रत्येक टप्प्यावर तिच्या भावासाठी वेगवेगळ्या गोष्टींचे त्याग करत असते. लहानपणी एकमेकांशी भांडणारे आणि दंगा-मस्ती करणारे हेच बहिण भाऊ मोठेपणी मात्र एकमेकांचे छान मित्रमैत्रीण होतात आणि एकमेकांना चांगल्या-वाईट प्रसंगात चांगली साथही देतात.
मात्र हीच बहिण काही वर्षांनी सासरी जाते तेव्हा मात्र भाऊ खचून जातो. याचाच प्रत्येय देणारा भाऊ-बहिणीचा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लग्नाआधी बहिणीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. बहिणीला हळद लावताना भाऊ खूप भावूक होतो. तो आपल्या बहिणीला मिठी मारतो आणि रडू लागतो. त्याच वेळी, बहिणीला देखील तिच्या भावना लपवता येत नाहीत आणि ती देखील रडू लागते. भाऊ-बहिणीतील हे प्रेम तिथे उपस्थित प्रत्येकाला जाणवते. हा व्हिडिओ @maithili.shorts या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो आतापर्यंत ३ दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “अगं आई मेकअप खराब होईल” पाठवणीच्या वेळीही नवरीला मेकअपचं टेन्शन; VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
व्हायरल व्हिडिओवर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘हे आहे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे सौंदर्य’, दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘खूप भावनिक क्षण’, दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘देव प्रत्येक बहिणीला असे भाऊ देवो.’ आणखी एका युजरने लिहिले, “बहीण-भावाचे नाते खूप खास असते. लहानपणापासून प्रत्येकवेळी बरोबर असलेली बहीण एक दिवस घर सोडून जाते, तेव्हा भावाला खूप दु:ख होते.”