Viral video: बाप-लेकीचं नातं काही स्पेशल असंत. कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर.बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो, लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही बाबा असतो. कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही बाबाच असतो. लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळतो आणि प्रसंगी बाबाचा धाकही असतोच. म्हणूनच म्हणतात ना, बाप-लेकीच्या नात्याला कसलीच तोड नाही. प्रेमळ पण वेळ प्रसंगी कठोर होणारा बाप हा लेकीच्या लग्नात मात्र धाय मोकलून रडतो. लेकीची पाठवणी करताना बाबा हळवा होतो, मात्र याच बापाची माया प्रत्येक मुलीच्या आयुष्यात शेवटपर्यंत राहतेच असं नाही. याचंच एक उदाहरण दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.
बहिण- भावाचं नातं कायमच अनोख असतं. कधी मस्ती तर कधी भाडणं. मात्र आयुष्यभर बहिणीसाठी भांडणारा भाऊ मात्र बहिणीच्या लग्नात अतिशय भावूक होतो. मग लग्नातील प्रत्येक कार्यात सर्वांपेक्षा अधिक उत्साही दिसतो. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये या भावानं आपल्या बहिणीच्या लग्नात वडिलांची जागा घेत तिच्या सोबत उभा राहिला आहे. लेकीच्या लग्नाआधीच सोडून गेलेल्या वडिलांची आठवण जेव्हा नवरीला लग्नात होते तेव्हा काय होतं हे तुम्हीच पाहा.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हळदीचा कार्यक्रम सुरु आहे आणि यावेळी नवरीच्या भावाने सोडून गेलेल्या वडिलांची आठवण आल्यानं त्यांचा फोटो या समारंभात आणला. यावेळी हा फोचो बघून भाऊ-बहिण दोघेही खूप भावूक झाले. वडिलांची जागा आयुष्यात कुणीही घेऊ शकत नाही असं म्हणतात मात्र वडिलानंतर एक भाऊच असतो जो वडिलांप्रमाणे बहिणीला जीव लावतो. अशाच भावाने वडिलांची जागा घेत बहिणीला धीर दिला आहे. बहिण भावाचं नातं कसं असतं हे या व्हिडीओतून पाहायला मिळालं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पुणेकरांचा नाद नाय! “बोल मै हलगी बजावू क्या” गाण्यावर हळदीला केला भन्नाट डान्स; VIDEO एकदा पाहाच
या जगात आल्यावर सर्वात आधी मुली कोणत्या पुरुषाला ओळखू लागतात, त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात, ज्याच्या जीवावर जगणं, हसणं, बोलणं, चालणं सुरु करतात तो असतो त्यांचा लाडका बाबा! खरं तर असं म्हटलं जातं की मुलगी या जगात येण्याआधीपासून तिच्यावर कोणी जीव ओवाळून टाकत असेल तर ते वडिल असतात.कधीतरी आपली लेक मोठी होणार आणि उंबरठा ओलांडून सासरी जाणार हे माहित असूनही आपल्या श्वासापेक्षा जास्त जपतो आणि गरजेपेक्षा अधिक देण्यात कमी पडत नाही ते वडिल असतात.