Brother-Sister Viral Video: वयाने कितीही मोठे झाले तरीही बहीण-भावामधील भांडण कधीही न संपणारे असते. बहीण-भावामधील प्रेम आणि भांडणं हे जगजाहीर असतात. ही भावंडं एकमेकांबरोबर क्षणात भांडतात आणि क्षणात पुन्हा एकत्र येतात. पण, हळूहळू आपण मोठे होतो तसे कामानिमित्त किंवा बहिणीचे लग्न झाल्यानंतर आपल्या बहीण-भावांपासून आपण दूरावतो. मग ही भेट फक्त रक्षाबंधन, भाऊबीज आणि एखाद्या कार्यक्रमातच होते. अनेकदा तर काही भावंडं मोठे झाल्यावर एकमेकांपासून एवढे दूरावतात, ज्यात ते कधी एकमेकांना भेटतही नाहीत. आजच्या काळात ही हक्काची, रक्ताची नाती आयुष्यभर टिकवून ठेवणंही खूप कठीण झालं आहे. पण आता असा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक वृद्ध बहीण-भाऊ रक्षाबंधन साजरा करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ जरी रक्षाबंधनचा असला तरीही तो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात; ज्यात कधी मनोरंजन करणारे तर कधी आपल्या मनाला भावूक करणारे व्हिडीओ असतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एका वृद्ध बहीण-भावाचं एकमेकांबद्दल असलेलं प्रेम पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स खूप कौतुक करताना दिसत आहेत.

two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Shocking video Husband took VRS due to wife's illness, wife died on the day of retirement
“नियतीचा खेळ” पत्नीच्या आजारपणामुळे लवकर रिटायरमेंट घेतली, पण निरोप समारंभातच तिने साथ सोडली; VIDEO पाहून धक्का बसेल
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Grandfather expressed his love To Grandmother
‘आमचं आय लव्ह यू…’ आजोबांनी हटके स्टाईलमध्ये प्रेम केलं व्यक्त; आजी लाजल्या अन्…, पाहा Viral Video
Brother gifted a house worth fifteen lakhs to his sister emotional video goes viral on social media
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घरामध्ये एक ८६ वर्षाचा भाऊ त्याच्या ८८ वर्षांच्या बहिणीकडून रक्षाबंधन करून घेण्यासाठी तिच्या घरी पोहोचला आहे. यावेळी वृद्ध बहीण भावाला राखी बांधून त्याचे औक्षण करते. भावा-बहिणीतील हे अतूट नातं पाहून नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये, “आजकालच्या या फसव्या जगात बहीण-भावाचं असं प्रेम बघायला मिळणं अवघड आहे. बहीण-भावाचं प्रेम असावं तर असं”, हे सुंदर कॅप्शन देण्यात आलं आहे.

हेही वाचा: ‘देवा, असे आई-वडील कोणालाच देऊ नको…’ सिंहाने जिराफ नर-मादीसमोर पिल्लावर केला क्रूर हल्ला; ते दोघेही फक्त पाहात राहिले… VIDEO पाहून नेटकरी हळहळले

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rajdhani_satara03 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय की, “खूप सुंदर”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय की, “सुंदर नातं.” तर आणखी एकाने लिहिलेय की, “नातं असावं तर असं.”

Story img Loader