Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ दरदिवशी व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात एवढंच काय तर काही व्हिडीओ भावुक करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला बहिणीच्या लग्नात ढसा ढसा रडत गाणं म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. काही लोकांना त्यांच्या बहिणीची आठवण येईल तर काही लोकांना त्यांच्या भावाची आठवण येईल.

बहिण भावाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी अन् जिव्हाळा असतो. बहिण भाऊ कितीही भांडले तरी एकमेकांशिवाय राहू शकत नाही. लग्नानंतर जेव्हा बहीण सासरी जाते तेव्हा एका भावासाठी हा खूप मोठा भावुक करणारा क्षण असतो.

सासरी निघाली बहीण, भावाचा कंठ दाटून आला

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकला हातात माइक घेऊन गाणं म्हणताना दिसत आहे. जाते लाडाची लेक आज सासरी हे लोकप्रिय गाणं गात आहे. हे गाणं गाताना तो भावुक होतो आणि ढसा ढसा रडतो. पुढे तुम्हाला दिसतो की तो रडत रडत गाणं म्हणतो. त्याला रडताना पाहून इतर लोक सुद्धा भावुक होतात. त्याचा भाऊ सुद्धा रडताना दिसतो. या गाण्याचे लिरिक्स इतके भावुक करणारे आहेत की ऐकून कोणालाही रडू येईल. लग्नसराईचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना या व्हिडीओने मात्र सर्वांचे लक्ष वेधले आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

adiraje2121 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भावा बहीणीचे प्रेम किती असते बघा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “रडु नको बाळा” तर एका युजरने लिहिलेय, “अरे बाळा तुझं गाणं ऐकून डोळ्यात अश्रू आले” आणखी एका युजरने लिहिलेय, “मस्त दादा” काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी दु:खी असल्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader