Brother Sister Viral Video : बहिण भावाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. बहिण भाऊ कितीही भांडले तरी एकमेकांशिवाय राहू शकत नाही. त्यांना एकमेकांशिवाय करमत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बहिण भावाची हॉस्पिटलमधली ही भेट पाहून कोणीही भावूक होईल.
बहिण भावाचा भावूक व्हिडीओ (Brother Sister Emotional Video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक हॉस्पिटल दिसेल आणि एक चिमुकली हॉस्पिटलच्या बेडवर झोपली आहे. तिच्या शेजारी डॉक्टर उभे आहे. ती आजारी आहे आणि मृत्यूशी झुंज देत आहे. तितक्यात तिचा छोटा भाऊ येतो आणि तिच्याशी बोलायला सुरुवात करतो. भावाला पाहून ती चिमुकली भावुक होते. न बोलता व शरीराची हालचाल न करता ही चिमुकली तिच्या भावाचे गाल पकडून लाड करते. भावाला पाहून ती तिच्या मनातील भावना रोखू शकत नाही. ती प्रेमाने भावाच्या चेहऱ्यावरून हात फिरवताना दिसते. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल. सध्या हा बहिण भावाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
sarika9889vavare या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”लहान असो किंवा मोठा भाऊ पाहिजे राव” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जगाचा विचार न करता निस्वार्थी प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे बहिणी, भाऊ” तर एका युजरने लिहिलेय, “डोळ्यातून अलगद पाणी आले .. आई माऊली खरंच या सोनलक्ष्मीला लवकर बरे कर”
आणखी एका युजरने लिहिलेय, “बहिण म्हणजे आपली दुसरी आई असते. बहीण आणि भावांचे प्रेम जगात कुठेच नाही” एक युजर लिहितो, “डोळ्यातून पाणी आले….आणि बहिणीची आठवण आली” तर एक युजर लिहितो, “निस्वार्थी प्रेम करणारी व्यक्ती म्हणाजे आपली लाडकी बहिण” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या बालपणीची आणि लाडक्या बहिण भावाची आठवण आली आहे.