Viral Video : सध्या भाऊबीजनिमित्त बहिण भावाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बहिण भावाच्या नात्यात जिव्हाळा, प्रेम, काळजी आणि आपुलकी दिसून येते. बहिण भाऊ एकमेकांबरोबर खूप भांडतात पण एक एकमेकांशिवाय राहू शकत नाही.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रुसलेल्या भावाला बहिण मनवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या बहिण किंवा भावाची आठवण येऊ शकते.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चिमुकला रुसून झोपला आहे.त्याने अंगावर चादर ओढली आहे आणि हाताने चेहरा लपवलाय. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की रुसलेल्या या चिमुकल्याला त्याची बहिण मनवताना दिसत आहे.
सुरुवातीला ती अंगावर ओढलेली चादर बाजूला करते आणि नंतर त्याच्या चेहऱ्यावरचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न करते पण रुसलेला चिमुकला शेवटपर्यंत ऐकत नाही. त्यानंतर बहिण प्रेमाने भावाला पप्पी देते पण तरीसुद्धा चिमुकला ऐकत नाही.हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या बालपणीची आठवण येऊ शकते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
sissygiovanna या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बहिण भावाचे प्रेम” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ही चिमुकली किती गोड आहे” तर एका युजरने लिहिलेय, “ती मोठ्या भावावर खूप प्रेम करते”