Brother Sister Video : बहीण-भावाचं नातं हे जगावेगळं असतं. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या नात्यात पाहायला मिळतो. दोघं एकमेकांशी कितीही भांडले तरी एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. जितके भांडतात तितकेच ते एकमेकांवर प्रेमही करतात. एकमेकांना वेळोवेळी आधार देतात. बहीण-भावाच्या अशाच एका गोंडस जोडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय, ज्यात एक लहान भाऊ गाणं गाणाऱ्या बहिणीला साथ देण्यासाठी स्टेजवर पोहोचला, यानंतर त्याने गाण्याचे फक्त मोजून दोन ते तीन शब्दच गायले, पण त्याचा ते गातानाचा उत्साह, आनंद आणि हावभाव पाहून तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आल्याशिवाय राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बहीण भावाच्या या जोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही अनेकांचे मन जिंकतोय. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक बहीण तिच्या धाकट्या भावासह स्टेजवर हातात माइक घेऊन उभी असल्याचे दिसतेय. यावेळी बहीण अगदी सुरात गातेय पण भाऊ शांतपणे उभा आहे. पण, मधेच तो माइक तोंडाजवळ आणतो आणि फक्त एकच शब्द गाऊन थांबतो. यानंतर बहीण पुन्हा गाणं गाऊ लागते. यानंतर पुन्हा बहिणीच्या गाण्याची ओळ संपताच भाऊ पुन्हा एकच शब्द गाऊन थांबतो. बहिणीसह तो गाण्यातील मोजकेच दोन तीन शब्द गाण्यासाठी आला होता, पण ते गातानाचा त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. त्याची बहीण ‘देवरा’ या चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनमधील फेमस गाणं गात होती.

बहीण- भावाचा सुंदर व्हिडीओ

बहिणाच्या संपूर्ण गाण्यादरम्यान धाकटा भाऊ फक्त एक, दोनच शब्द गात होता, पण ते गातानाही तो खूप उत्साहित आणि आनंदी दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्टपणे सांगतायत की, बहिणीला गाण्यात योग्य वेळी साथ देऊन त्याला खूपच आनंद होतोय. चाहत्यांना त्याने गायलेले शब्द तर आवडलेच, पण त्याचा चेहऱ्यावरील हास्य आणि हावभाव अनेकांना आवडला आहे. अनेकांनी या भावाचे तोंड भरून कौतुक केले.

हा क्यूट व्हिडीओ @melo___phile नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेक जण क्यूट अशी कमेंट करतायत; तर काही जण बेस्ट ब्रदर म्हणत त्याचे कौतुक करतायत.