Shocking video: सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात, ज्यामध्ये कुठे ना कुठे चित्रविचित्र घटना घडत असल्याचं दिसून येतं. काही घटन इतक्या मजेशीर असता, ज्या पाहून लोकांना हसू आवरत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.लग्न म्हणजे प्रेम, आनंद आणि नातेवाईकांसोबत मजा मस्ती. यावेळी संगीत, डान्सशिवाय तर हल्ली लग्नच होत नाहीत. यावेळी अनेकदा दुसऱ्याच्या लग्नाला हजेरी लावताना लोक आपल्याही जोड्या शोधतात. अशाच एका तरुणाला आपल्या बहिणीबरोबर डान्स केला म्हणून भावाने चांगलीच अद्दल घडवली आहे.भावा-बहिणीचे नाते हे प्रेमाचे नाते समजले जाते. आई-वडिलांपासून एखादे गुपित लपवायचे झाल्यास ते आधी आपल्या बहिणीला सांगितात. किंवा वडिलांचा मारापासून वाचवण्यासाठी बहिणीच ढाल बनून पुढे येते. मात्र बऱ्याच वेळा ही बाजू बहिणीची असेल तर हेच भाऊ कठोर होतात. अशाच एका भावाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये आपल्या बहिणीसोबत नाचणाऱ्या तरुणासोबत भावाने काय केलं पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडिओमध्ये, एक मुलगा आणि मुलगी हळदीच्या कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहेत. यावेळी गाण्यावर दोघेही ठेका धरताना दिसत आहेत, हा मुलगाही मुलीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी हे सर्व मुलीचा भाऊ पाहतो आणि मुलीला थांबवतो आणि घरात ढकलतो. तर पुढच्याच क्षणी त्या तरुणाला जोरदार कानाखाली लागवतो, यावेळी तो तरुण खाली पडतो.

सगळ्या नात्यांमध्ये अगदी वेगळं नातं कोणाचं असेल, तर ते भाऊ- बहिणीचं! ते दोघे एकमेकांशी भांड भांड भांडतील; पण त्या दोघांतल्या प्रेमाला कधीच ओहोटी लागत नाही. त्यांचं एकमेकांशी कधीच पटणार नाही; पण त्या दोघांच्याही मनात सातत्याने एकमेकांबद्दल मायेचा ओलावा पाझरत असतो. म्हणूनच जेव्हा लग्न करून बहीण दुसऱ्याच्या घरी जाते तेव्हा प्रत्येक भावाच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. प्रसंगी कठोर बनणारा भाऊच असतो जो सगळ्यात जास्त प्रेम बहिणीवर करत असतो. या व्हिडीओमधून हेच दिसत आहे की, आपल्या बहिणीच्या चांगल्यासाठी भाऊ काहीही करु शकतो.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ nagpuri_page_ranchi या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने म्हंटलंय की, “भाऊ हा भाऊच असतो”