Brother Sister Heart Touching Video Viral: आई-वडील आणि भावंडे, असा प्रत्येकाचाच एक परिवार असतो. त्यातूनही भाऊ-बहीण, बहिणी आणि भावांचे नाते हे फारच अनोखे असते. प्रत्येक नात्याचे स्वतःचे महत्त्व आणि प्रेम असते; परंतु भाऊ-बहिणीचे नाते हे जगातील सर्वांत प्रेमळ नाते मानले जाते. भाऊ-बहिणीचे नाते हे फारच खास असते. त्यातून आपले जगात कोणीही नसेल तरीसुद्धा भाऊ किंवा आपली बहीण कायमच आपल्यासोबत असेल यावर आपला विश्वास असतो.
भाऊ-बहीण दिवसभर एकमेकांशी भांडत राहतात; पण कोणताही त्रास होताच दोघेही एकमेकांना साथ देऊ लागतात. भाऊ-बहिणीचे हे नाते खूपच अतूट असते. सोशल मीडियावरही बहीण-भावाचे कधी मस्ती करतानाचे, तर कधी खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. चिमुकल्या बहीण-भावाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असाच एक चिमुकल्या बहीण-भावाचा अनोखा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. काही लोकांना त्यांचे बहीण-भाऊ आठवतील. या व्हिडीओतून आपल्याला भाऊ-बहिणीचे गोड नाते पाहायला मिळेल. सध्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांच्या तुफान प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
(हे ही वाचा : दारूच्या नशेत कारचालकाने स्कूटीला दिली जोरात टक्कर, हवेत फेकली गेली तरुणी, १३ सेंकदाचा अपघाताचा भीषण VIDEO व्हायरल )
व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसले?
सध्या पावसाळा सुरू आहे आणि कधी कधी इतका मुसळधार पाऊस पडतो की, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साठते. अशा परिस्थितीत लोकांना रस्ता ओलांडणेही कठीण होते. खास करून पायांत घातलेले बूटदेखील ओले होऊन खराब होण्याची भीती असते. आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भाऊ आणि बहीण शाळेच्या ड्रेसमध्ये असल्याचे दिसत आहेत. शाळकरी चिमुकल्या मुलीचे शाळेचे बूट ओले होऊ नयेत म्हणून तिच्या भावाने तिला मदत केली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये त्याच्या पायांत बूट दिसत नाहीत; पण त्याच्या बहिणीच्या पायांत बूट दिसत आहेत. साठलेल्या पाण्यात बहिणीचे शाळेचे बूट ओले होऊ नयेत म्हणून तिचा भाऊ तिला पाठीवरून घेऊन जाताना दिसतोय. सर्वांची मने जिंकणारा या दोघा बहीण-भावाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @iAkankshaP नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “या जगात सर्वांत प्रेमळ नाते हे भाऊ आणि बहिणीचे आहे.” वृत्त लिहेपर्यंत हा व्हिडीओ चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एकाने लिहिलेय, “भाऊ आणि बहिणीचे नाते असे असते.” दुसऱ्या एकाने लिहिलेय, “हा खूप सुंदर व्हिडीओ आहे.” एका युजरने लिहिलेय, “तो आत्मविश्वास आणि विश्वास कुठेही जुळू शकत नाही.” सध्या हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत.