रक्षाबंधन म्हणजेच राखीपौर्णिमा, या दिवस भाऊ आणि बहिणीच्या नात्यातील गोडवा दाखवणारा आणि सर्वात पवित्र असा सण. या दिवशी बहीण आपल्या भाऊरायाला राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण या बरोबरच या दिवशी भावाला आपल्या बहिणीला काहीतरी भेटवस्तू द्यावी लागते. खरं तर रक्षाबंधनाला प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीसाठी काही ना काही भेट वस्तू देतोच. मात्र, अनेक बहिणी आपल्या भावांचे खिसे मोकळे करण्याच्या तयारीत असतात. कारण हा दिवस असा असतो ज्या दिवशी त्या हक्काने आपल्या भावाकडे काहीही मागू शकतात. पण काही भाऊ देखील खूप हुशार असता जे या दिवशी आपला कसा खर्च कमी होईल यासाठी नवनवीन आयडीया शोधत असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका जुगाडू भावाशी संबंधित एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने रक्षाबंधनाच्या दिवशी कमी खर्च करण्यासाठी एक अनोखा जुगाड शोधल्याचं दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल फोटोमध्ये नेमकं काय आहे?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी होणाऱ्या सर्व खर्चाचा हिशोब केला आहे. ज्यामध्ये त्याने लिहिलं आहे.

मावशीच्या मुलीला ११ रुपये,

शेजारच्या बहिणीला १० रुपयांची डेअरी मिल्क.

शाळेतील बहिणीला २१ रुपये.

शिकवणीतील बहिणीला ११ रुपये आणि ५ रुपयांची डेअरी मिल्क. तसेच आणखी कोणती बहिण आल्या तर त्यांना ५ रुपयांच्या ४ पर्क आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या मुलाने त्याच्या सख्ख्या बहिणीला १ रुपयाची २ eclairs चॉकलेट देणार असल्याचं लिहिलं आहे, त्यामुळे त्याने आपला संपूर्ण रक्षाबंधनाचा खर्च केवळ ८० रुपयांमध्ये भागवल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकजण त्याला जबरदस्त भाऊ, तर कोणी कंजूस भाऊ म्हणत आहे. शिवाय हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही पाहा- “अंतराळातून कसा दिसतो भारत?” इंदिरा गांधींच्या प्रश्नावर राकेश शर्मांनी दिलेल्या अप्रतिम उत्तराचा VIDEO होतोय व्हायरल

व्हायरल पोस्ट पाहा –

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

या तरुणाच्या अनोख्या हिशोबाचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @indian.official.memes नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एवढा दमदार जुगाड पाहिल्यानंतर नेटकरीदेखील तो मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. या पोस्टला आतापर्यंत २ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, “हा माणूस आपल्या बहिणीला फक्त १ रुपयाची १ चॉकलेट देत आहे.” तर दुसर्‍या यूजरने लिहिले, “वाह भाऊ, काय जबरदस्त आयडीया दिलीस.” तिसऱ्याने लिहिलं, “तू खूप खतरनाक माणूस आहेस.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brothers unique trick to reduce the cost of rakshabandhan after seeing the viral photo netizens say great idea jap