सध्या रस्ते अपघातांचं प्रमाण खूप वाढत चाललंय. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. एक अपघात आपल्याबरोबरच दुसऱ्याचं आयुष्यदेखील संपवू शकतो, हेदेखील आजकाल अनेकांना कळत नाही. यात कोणाचं नशीब चांगलं असेल तर तो वाचतो, नाहीतर असे भयंकर अपघात अनेकांचे जीवच घेतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका चुकीमुळे लहान मुलगा चालत्या गाडीखालीच आला.

अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका रस्त्याच्या कडेला एक माणूस आपल्या फोनमध्ये बघत उभा राहिल्याचं दिसतंय. तेवढ्यात अचानक मागून त्यांचा लहान मुलगा अगदी जोरात धावत रस्त्यावर येतो. त्याच क्षणी एक कार तिथून जात असते. मुलगा आणि कार एकाचवेळी आल्याने तो लहान मुलगा गाडीखाली येतो. हे पाहताच तो माणूस कारच्या मागे धावत जातो आणि आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात तिथे खूप गर्दी जमते आणि लोक गाडीचा दरवाजा खोलून ड्रायव्हरला मारू लागतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या @marathwada_marathi_news इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “चिमुरडा धावत थेट गाडीखाली गेला, पालक मोबाईलच्या धुंदीत; थरारक घटनेचा CCTV समोर” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तर व्हिडीओला तब्बल ७ लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “चुकी त्या उभा असणाऱ्या माणसाची आहे” तर दुसऱ्याने “नशीब आजकाल सर्व ठिकाणी CCTV आहेत नाहीतर असले लोक स्वतःची चुक असताना दुसऱ्याला दोष देतात, हा माणूस स्वतः मोबाईलमध्ये व्यस्त आहे. त्या बापाला अक्कल असली पाहिजे ” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “यात गाडीवाल्याची काहीही चूक नाही.”

Story img Loader