Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध व्हिडीओ व्हायरल होतात. त्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओदेखील आपल्या नजरेस पडतात. या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात; तर कधी हेच प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. शिकारीच्या व्हिडीओंमुळे आपला नेहमीच थरकाप उडतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय; ज्यात सिंहाचे दोन शावक पाणघोड्यावर हल्ला करताना दिसत आहेत.

सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते. सिंह, वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्त्र प्राणी जंगलातील इतर प्राण्यांवर अनेकदा हल्ला करताना दिसतात. त्यामुळे इतर प्राणी नेहमीच त्यांना घाबरून असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीसं पाहायला मिळत आहे; जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Steve Smith Smashes 34th Test Century and 11th Hundred Against India Most By any Batter IND vs AUS
IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलामध्ये सिंहाचे दोन शावक पाणघोड्यावर हल्ला करताना दिसत आहेत. सुरुवातीला एक शावक पाणघोड्याच्या मागे जाऊन, त्याच्यावर हल्ला करतो, त्यावेळी तो पाणघोडा खूप कळवळतो. त्यानंतर दुसरा शावकदेखील पाणघोड्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो; पण पाणघोडा त्याला दूर करतो. त्यानंतर हे दोन्ही शावक पाणघोड्यापासून दूर जातात आणि पुन्हा पाणघोड्यावर हल्ला करण्याच्या तयारीत दिसतात.

हेही वाचा: ‘झो झो झोपाळा’, कपड्याचा बनवला झोका; श्वानांचा जगावेगळा खेळ VIDEO पाहून येईल हसू

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @_ngorongoro या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि दोन हजारहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय की, “पुढे काय झालं तेही पाहायचं आहे”. तर दुसऱ्या युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय की, “खूप थरारक व्हिडीओ आहे. पुढचा भागदेखील पाहायला आवडेल”.

दरम्यान, यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात सिंहाच्या शावकांवर म्हशींच्या कळपानं हल्ला केला होता. तर, आणखी एका व्हिडीओमध्ये वाघानं एका हरणाची शिकार केली होती.

Story img Loader