Brutal Accident Video: जगभरात रस्ते अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. अशा भयंकर अपघातात अनेकदा माणसं जखमी होतात; तर काही जण या अपघातांमध्ये आपला जीव गमावतात. कधी वाहनचालकाच्या चुकीमुळे, तर कधी दुसऱ्यांच्या चुकीमुळे अशा अपघातांना अनेकांना सामोरं जावं लागतं. एका क्षणात त्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. अनेक जण वाहतुकीचे नियम पाळत नसल्यामुळे अशा दुर्घटना होतात.
सोशल मीडियावर अशा अपघातांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. सध्या अशीच एक दुर्घटना एका ठिकाणी घडली आहे; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये झालेला अपघात तुम्ही कधीच पाहिला नसेल. नेमकं असं झालं तरी काय ते जाणून घेऊ…
भीषण अपघाताचा व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अपघाताच्या व्हिडीओची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, कारचालक किती भयंकर अपघातात सापडला आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला, अशी चर्चा आहे. कार रस्त्यावरून चक्क आडवी होऊन भरवेगात आली. यादरम्यान ही कार एका खांबाला जोरदार आपटली. कार आपटल्यानंतर कारच्या दरवाजातून कारचालक थेट बाहेर फेकला गेला आणि रस्त्यावर पडला. कार खांबावर जोरात आदळल्याने कारचा चक्काचूर होऊन, कारच्या कूलंटमधून ऑईल बाहेर फेकलं गेलं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @prashanttt___04 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर ५.५ दशलक्ष व्ह्युज आले आहेत. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली ते अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “म्हणून गाडी चालवताना सीटबेल्ट लावणं महत्त्वाचं आहे,” तर दुसऱ्यानं तो माणूस ठीक आहे ना, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “भयंकर अपघात झाला. नशीब जीव वाचला.”
हेही वाचा… काकी जरा दमानं! चालत्या ट्रेनला लटकली महिला, पुढे जे घडलं ते भयंकर, VIDEO पाहून कपाळावर माराल हात