BTS Jungkook Viral Video: जगभरातील सर्वात आवडता म्युझिक ब्रँडमध्ये बीटीएस नेहमी टॉपमध्ये असतो. कोरिअन बॉय बँड बीटीएसच्या (BTS) सातही सदस्य जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यांचे फॅन फॉलोइंग देखील चांगली आहे. या दिवसात बीटीएस मेंबर्स एकत्र कोणतेही कॉन्सर्ट करू शकत नसले तरी ते त्यांच्या फॅन्सबरोबर कनेक्टेड राहतात. नुकताच जुंग-कूक याने आर्मीबरोबर ( बीटीएसच्या फॅन्सचा उल्लेख आर्मी असा करतात) लाइव्ह सेशन केले होते.
चाहत्यांबरोबर जुंग-कूकने केले लाइव्ह सेशन
रविवारी सकाळी जेव्हा जुंग-कूकला झोप येत नव्हती तेव्हा त्याने त्याच्या चाहत्यांबरोबर लाइव्ह सेशन करण्याचे ठरविले. काळा टीशर्ट परिधान करून जुंग-कूक लाइव्ह सेशनमध्ये त्याच्या लाखो चाहत्यांबरोबर संवाद साधत होता.दरम्यान, जुंग-कूकने त्याच्या फॅन्सला सांगितले की मी जर असाच झोपलो तर कंपनीवाले वेडे होतील.
हेही वाचा – इंडिगोचं विमान निघालं अहमदाबादला, पोहलचं पाकिस्तानमध्ये! अर्ध्या तासानंतर आलं भारतात
लाइव्ह सेशनमध्ये झोपला जुंग-कूक
असे सांगून काही वेळातच त्याला झोप आली आणि तो तिथे तसाच झोपून गेला. तो झोपल्यानंतर साधारण २१ मिनिटे लाईव्ह सेशन चालू होते आणि ६ मिलीयन लोक त्याला झोपताना पाहत होते. जुंग-कूकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. जिथे जुंग-कूक ट्विटरवर ट्रेंडदेखील करू शकतात.
चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर जुंग-कूकच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहे. एका यूजरने म्हटले की,”तर आम्ही ६.६ मिलियन चाहते खरोखर त्याच्या रुमध्ये त्याच्या बेडवर होतो, जुंग-कूक अमेझिंग आहे.” तर दुसऱ्याने म्हटले की, ”कधी कधी घर एका व्यक्तीचे असते आणि कम्फर्ट एका व्यक्तीमुळे मिळतो. आनंद हा एका व्यक्तीच्या रूपात असतो. माझ्यासाठी हे सर्व काही एकच व्यक्ती आहे तो म्हणजे जुंग-कूक.” तो नेहमी माझा आवडता कम्फर्ट व्यक्ती असतो.
तुम्हाला कदाचित माहित नसेल पण हे पहिल्यांदा घडले नाही जेव्हा लाइव्ह सेशनमध्ये झोपला होता. या गायकाने यापूर्वी असे केले होते.
BTS इतके प्रसिद्ध का आहे?
Bangtan Sonyeondan उर्फ BTS हा 7 सदस्य RM, Suga, Jin, J-Hope, Jimin, V, आणि Jungkook यांचा म्युझिक बँड आहे. आरएम हा बँडचा नेता आहे. BTS ची स्थापना २०१२ साली झाली. त्याचा पहिला अल्बम ”२ कूल ४ स्कूल” २०१३ साली रिलीज झाला. BTS ने ‘रन BTS’, ‘फायर’, ‘बटर’, ‘फेक लव्ह’ आणि ‘बॉय विद लव” सारखे हिट अल्बम तयार केले. आजकाल BTS मेंबर्सची ही टीम ब्रेकवर आहेत. जिन आणि जे-होप दक्षिण कोरियाच्या सशस्त्र दलात अनिवार्य लष्करी सेवा देत आहेत.