leopard Vs Deer Hunting Video Viral : घनदाट जंगलात हिंस्र प्राणी शिकारीच्या शोधात वणवण भटकत असतात. पण वाघ, बिबट्यासारख्या प्राणी शिकार समोर दिसताच क्षणात होत्याचं नव्हतं करुन टाकतो. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा झाल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. असंच काहीसं एका जंगलात घडल्याचं व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. कारण दोन हरणांच्या जोरदार लढाई सुरु असताना अचानक एक खुंखार बिबट्या तिथे येतो आणि काही सेकंदातच बाजी पलटते. शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याला अचानक दोन हरण दिसतात. पण तो एका हरणाचा पाठलाग करतो आणि त्यानंतर जे काही घडतं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वन्य प्राण्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका जंगलात दोन हरण तुंबळ हाणामारी करत असतात. त्याचदरम्यान एका बिबट्याची एन्ट्री होते आणि काही सेकंदातच मोठा थरार सुरु होतो. हरणांचं भांडण सुरु असतानाच बिबट्या तिथे येतो आणि एक हरण त्याठिकाणाहून पळ काढतो. परंतु, बिबट्याच्या वेगापुढे हरणाची काहीच चालत नाही. जीव मुठीत घेऊन धावणाऱ्या हरणावर बिबट्या झेप घेतो आणि पंजा मारून त्याची शिकार करतो. हरणाची शिकार केल्यानंतर बिबट्या त्याच्यी मान जबड्यात पकडून जंगलात निघून जातो. बिबट्याने हरणाची शिकार केल्याचा थरार कॅमेकात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा – पॅराग्लायडिंग करताना आकाशात बेशुद्ध झाला, पण डोळे उघडताच केलं असं काही…व्हिडीओ पाहून यूजर्स लोटपोट हसले

इथे पाहा बिबट्याचा खतरनाक व्हिडीओ

@Latestkruger नावाच्या यूजरने हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. हरणाचा आणि बिबट्याचा हा खतरनाक व्हिडीओ थक्क करणारा असून या व्हिडीओतून धडा घेण्यासारखंही खूप आहे. व्हिडीओत पाहू शकता की, दोन हरणांमध्ये जोरदार लढाई सुरु असते. परंतु, त्याचदरम्यान बिबट्या येतो आणि एका हरणाची शिकार करतो. बिबट्या शिकारीसाठी झाडीमध्ये लपलेला असतो. पण हरणांचं दुर्लक्ष होताच तो संधीचा फायदा घेतो आणि एका हरणाला जीव गमवावा लागतो. हरण सतर्क न राहिल्याने बिबट्याने त्याची शिकार केली. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी वेगेवगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bucks deer fighting with each other leopard takes an advantage of it and attacks on deer hunting terrible video viral nss