Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज सलग पाचवा अर्थसंकल्प सादर करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका असल्यामुळे पुर्ण अर्थसंकल्प सादर होणार नाही. आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात काही वस्तूंवरील आयात कर आणि कस्टम ड्युटी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये सिगारेट आणि महागड्या दागिण्यांचा समावेश आहे. अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितले की, सिगारेटवरील National Calamity Contingent Duty (NCCD) मध्ये १६ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. सिगारेट महाग होणार ही बातमी जशी पसरली तसं सोशल मीडियावर विनोदी मीम्सचा महापूर आला. अनेकांनी मिम्स शेअर करुन “हे दुःख संपत का नाही…” अशी खंत व्यक्त केली.
एका युजरने निर्मला सीतारमण यांचा फोटो शेअर करत लिहिले की, निर्मला ताई सिगारेट महाग करायला नको होती. तुमच्या वार्षिक बजेटमुळे आमचे रोजचे बजेट बिघडले.
Budget 2023 : पॅन कार्डबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा, म्हणाल्या…
काहींनी मीम्सच्या माध्यमातून या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असली तरी अनेकजण असे आहेत. ज्यांना याचा आनंद झाला आहे. काहींनी कर्करोगग्रस्त रुग्णाचा फोटो शेअर करत ‘या निर्णयामुळे सर्वात आनंदी झालेला व्यक्ती’, असे कॅप्शन दिले आहे.
अनेकांनी सिगारेट आरोग्यासाठी हानीकारक असून अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
काय काय महाग झालं?
आजच्या अर्थसंकल्पात काही वस्तूंवरील कर वाढवल्यामुळे त्या महाग झाल्या आहेत. यामध्ये सोने, प्लॅटिनम, हिरे, सिगारेट, पितळ, परदेशी खेळणी, कपडे इत्यादी वस्तू महाग होणार आहेत.
काय स्वस्त होणार?
मोबाईल फोन आणि कॅमेरा लेन्स स्वस्त होणार आहे. तसेच एलईडी टीव्ही आणि बायोगॅसशी संबंधित उपकरणं स्वस्त होतील. अलिकडेच टीव्हीच्या भागांवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक कार, खेळणी आणि सायकल स्वस्त होतील.