Budget 2024 Memes: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४- २५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात प्रत्येकासाठी काही ना काही देण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. दरम्यान, लोक प्राप्तिकरातील बदलांची सर्वाधिक वाट पाहत होते; परंतु त्यात कोणताही बदल न झाल्याने लोकांच्या पदरी निराशाच पडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा असतील, अशी अपेक्षा होती; पण त्यांच्या पेटाऱ्यातून फारसे काही हाती लागले नाही. अशा परिस्थितीत मीम्सबाज आता हिंदी चित्रपटांमधील सीन आणि विनोद असलेल्या मजेदार मीम्सद्वारे आपल्या भावना व्यक्त करीत आहे. बजेटसंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशाच काही मजेशीर मीस्स पाहू…

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या घोषणांमध्ये म्हटले की, जर एनडीएचे सरकार स्थापन झाले, तर भारत सरकार पुढील पाच वर्षांत आणखी दोन कोटी लोकांसाठी घरे बांधेल, तसेच ३०० युनिट मोफत वीज देण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे. पण, ज्या निर्णयाची लोक आतुरतेने वाट पाहत होते, त्या आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आता ज्या दराने तुम्ही आयकर भरत आहात, त्याच दराने तुम्हाला भविष्यातही कर भरावा लागेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget 2024 memes middle class and salaried class memes viral after finance minister nirmala sitharaman budget speech for interim union budget 2024 2025 sjr