Union Budget 2025 Memes : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी लोकसभेत २०२५ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून आयकर भरणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. दरमहा १ लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीलाही कर भरावा लागणार नाही, म्हणजे आता १२.७५ लाख रुपयांपर्यतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. तसेच तुम्ही आता मागील ४ वर्षांचे आयटी रिटर्न एकत्र दाखल करु शकाल, या घोषणेनंतर आता मध्यमवर्गीयांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला आहे. काहींनी मीम्सच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका युजरने ट्विट करत लिहिले की, “बजेट २०२५, मध्यम वर्गांसाठी गेम चेंजर” तर दुसऱ्याने म्हटले की, “मध्यमवर्गासाठी हा एक मोठा दिलासा आहे.”

काही लोकांनी मजेदार मीम्स बनवून आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. यात अनेकांनी चित्रपटातील डायलॉग अन् डान्स व्हिडीओच्या वापर करुन भन्नाट मीम्स बनवले आहेत.

सोशल मीडियावरील आणखी काही प्रतिक्रिया

या फोटोद्वारे यूजर्स अर्थमंत्र्यांचे आभार मानताना दिसत आहेत. आर्यन मित्तल नावाच्या एका एक्स यूजरने हा फोटो पोस्ट करून अर्थमंत्र्यांचे कौतुक केले आहे.

मध्यमवर्गीयांमध्ये आनंदाचे वातावरण

मध्यमवर्गीयांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. या मीमच्या माध्यमातून युजरने ’12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर माफ केल्यावर लोक कसे सेलिब्रेशन करत असतील’ हे दाखवले आहे.