Buffalo Drags Huge Crocodile Out of the Water: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात काही प्राण्यांचे असतात तर काही मानवी जीवनावर आधारित असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जंगलात महाकाय मगर आणि म्हैस यांच्यामधील लढाई पाहायला मिळत आहे. या दोघांमधील लढाई पाहून तुमच्याही अंगावर क्षणभर काटा येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मगरीने पकडले म्हशीचे नाक

जसं सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात त्याचप्रमाणे मगरीलाही पाण्यातील राक्षस म्हणतात. कारण जंगलात सिंह ज्याप्रमाणे राज्य करतो तसंच मगरही तलाव आणि नदीवर राज्य करते. पाण्यात जर कोणताही प्राणी आला तर त्याचा मृत्यू जवळपास निश्चित असतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, म्हैस आपल्या कळपासह नदीकिनारी पाणी पीत होती. दरम्यान अचानक एक मगर पाण्यातून येते आणि मगरीने म्हशीचे नाक आपल्या जबड्यात पकडते.मात्र त्यानंतर जे घडले ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: नोकरीच्या जाहिरातीने जिंकले हर्ष गोएंकांचे मन; थेट गणितचं दिलेल्या जाहिरातीत असं आहे काय पाहा)

मगर म्हशीला सर्व शक्तीनिशी पाण्याखाली खेचत असते. मात्र म्हैस देखील हिंमत सोडत नाही. तिला वेदना हिट असतानाही ती मगरीला सर्व शक्तीनिशी बाहेर काढते. मगर पाण्याबाहेरही म्हशीला पकडून ठेवते. पण शेवटी म्हशीच्या धाडसापुढे मगरीला पराभव स्वीकारावा लागतो.या व्हिडिओला आतापर्यंत भरपूर व्ह्यूज मिळाले असून अनेकजण यावर आपल्या वेगवेगळ्या कंमेंट करत आहे. तसंच हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे.