Viral video: आपल्याकडे कुत्रे, गायी, म्हशी असे अनेक प्राणी आहेत जे रस्त्यावर मोकळेपणाने फिरतात. हे प्रामुख्याने गाव खेड्यांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. परंतु आजकाल हे प्राणी शहरांमध्येही आढळतात.मात्र पाळीव असले तरी हे प्राणी बऱ्याचदा धोकादायक ठरतात. हे प्राणी कधी अचानक हल्ला करतील सांगू शकत नाही. अशीच एक घटना सध्या समोर आली आहे. यामध्ये बुलेटवरुन जाणाऱ्या एका युवकाला म्हशीने जोरदार टक्कर दिली आहे. हा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रिकामा रस्ता आहे. यावेळी म्हशीला घेऊन एक महिला तिथून जात आहे. या दरम्यान समोरुन एक तरुण बुलेटवर येतो. गाडी भरधाव वेगानं येते आणि म्हशीच्या बाजूने जायला लागते. तेवढ्यात म्हैस पलटते आणि दुचाकीस्वाराला जोरदार धडक देते. धडक दिल्यानंतर दुचाकी आणि व्यक्ती रस्त्यावर पडतो, तो माणूस गंभीर जखमी झाल्याचे दिसते आहे. बुलेटमधून येणाऱ्या मोठ्या आवाजामुळे म्हशीने हल्ला केला असं नेटकरी म्हणत आहे. गाडीच्या आवाजाने प्राण्यांना त्रास होतो आणि ते सैरावैरा पळू लागतात. असाच प्रकार याठिकाणीही झाल्याचं बोललं जातंय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> सुरक्षा रक्षकानं अडवलं म्हणून तरुणाची बेदम मारहाण; वाराणसीमधला VIDEO तुफान व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत.या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलंय.