‘आये हम बाराती बारात लेके, दुल्हन को भी ले जायेंगे साथ लेके’ अशी धून बँड बाजावर वाजवत, मस्त नाचत नवरदेवाचे मित्र आणि नवरदेव आला. नाचत गाजत वऱ्हाडी मंडळी लग्न लावण्यासाठी मंडपात गेली. नवरी ही सजून-धजून नटून थटून येणार बाई साजन माझा म्हणत नवरदेवाची वाट बघत भावी आयुष्याचे स्वप्न रंगवू लागली. वऱ्हाडी मंडळी येऊन मंडपात बसली. मात्र, त्याच वेळस नवरीकडील मंडळींनी लग्न मोडलं.
लग्न मोडायचं कारण काय?
हे लग्न मोडायचं कारण ठरलं नवरदेवाचं उशिरा येण. नवरीकडील मंडळींनी नवरदेवयाला यायला उशिरा झाला म्हणून लग्न मोडलं. फक्त लग्न मोडूनच ते थांबले नाहीत तर, मुलीच्या वडिलांनी दुसऱ्या मुलांसोबत तिचं लग्नही लावून दिलं. एवढेच नाही तर लग्नातील वऱ्हाडींना यावेळी लग्न जेवणा ऐवजी आल्या पावली परत पाठवल्याने. लग्न उशिरा लावणार्यांना मोठी चपराक दिला.
(हे ही वाचा: मॅक्सवेलच्या लग्नाच्या पार्टीत विराट कोहलीने केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर viral)
नक्की काय झालं?
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील कंडारी येथील पवार यांच्या मुलाचे मलकापूर पांग्रा येथील गवई यांच्या मुलीशी रीतीरिवाजाप्रमाणे लग्न ठरले होते. २३ एप्रिलला दुपारी लग्नाचा मुहूर्त होता त्यासाठी वराकडील मंडळी बँड बाजा घेऊन मलकापूर पांग्रा येथे नाचत गाजत दाखल झाले, दुपारचे लग्न होते, मात्र लग्न उशिरा आल्याने भेटीगाठी आणि वाघीणसा रात्री ८ वाजता झाला. बँड बाजावर वऱ्हाडी मंडळीनी ठेका धरलेला असताना लग्नाला उशीर झाला म्हणून नवरी कडील मंडळींनी वराकडील मंडळींना तुम्ही उशिरा का आले? , म्हणून विचारणा केली. चारता विचारता बाचाबाची झाली आणि वाद वाढला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर लोकांनी मध्यस्थी करून समजावून सांगितले , माफीनामा झाला , मात्र वधूकडील मंडळींनी आम्हाला या नवरदेवासोबत लग्न लावायच नाही, असे सांगून आल्या पावलांनी भर लग्न मंडपातून ओल्या हळदीच्या अंगाने लग्न न लावताच आल्या पावली परत पाठविले.
(हे ही वाचा: सासूने ओवाळून नववधूच्या डोक्यातच घातला नारळ; व्हिडीओ सोशल मीडियावर viral)
(हे ही वाचा: ट्रॅफिक पोलिसांसोबतच रस्त्याच्या मधोमध पठ्ठ्याने केला डान्स; Video सोशल मीडियावर व्हायरल)
घडलेल्या प्रकारामुळे लग्न ठिकाणी एकच शांतता पसरली आता हळद लावलेल्या नवरीला ठेवायचे कसे म्हणून वधुपित्याने शोधाशोध करून दुसरबीड येथील नात्यातील एक मुलगा बघितला आणि रात्रीच त्याच्यासोबत शुभमंगल उरकून दिल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देऊळगाव कोळ येथील आत्याच्या मुली सोबत ओल्या हळदीने बसलेल्या नवरदेवाचा बारही उडवून दिला.