Viral video: रस्त्यावर अनेक भटके प्राणी फिरत असतात. कुत्रे, गायी, म्हशी, बैल, असे वेगवेगळे प्राणी रस्त्यावर दिसतात. कधी कधी हे प्राणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतानाही दिसतात. त्यामुळे भटक्या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. कधी कधी पाळीव प्राणीही संतापात हल्ला करताना दिसून येतात. नुकताच एका संतापलेल्या बैलाचा व्हिडीओ समोर आलाय. हा बैल थेट घरात घुसला असून त्यानं घराबाहेर उभ्या असलेल्या बायकांना अक्षरश: शिंगानं उडवून लावलं आहे. हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ तुम्हीही एकदा पाहाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बैल गावातून जोरजरात पळत सुटला आहे. बैल पळ सरळ वस्तीत शिरल्यानं सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. या बैलाला थांबवण्यासाठी, शांत करण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचवेळी या बैलाला पाहण्यासाठी गावकरी आपआपल्या घराबाहेर आलेले आहे. यावेळी अचानक पिसाळलेला बैल एका घरात शिरतो, तसेच घराबाहेर उभ्या असलेल्या बायकांनाही उडवतो.तर काही महिलांना शिगांने बाहेर फेकतो. या हल्लाध्ये महिला जखमी झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यानंतर सर्वच आपला जीव वाचवून सैरावैरा पळतानाही दिसत आहेत.

एखादा बैल पिसाळला तर त्याला शांत करताना भल्या भल्यांना घाम फुटतो.याचंच हे एक उदाहरण.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जावई बापू रुसू नये म्हणून अनोखा मानपान; हायवेवरचा भन्नाट VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण चर्चा करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @hori__habba__abhimanigaluनावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत ४० हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट झालं नाही. प्राण्यांचे असे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच पहायला मिळते. भटक्या प्राण्यांच्या अशा दहशतीमुळे लोकांच्या मनात भिती बसली आहे.