Bull attacked bike rider video: जंगलतोडीमुळे मानवी वस्तीत जंगली प्राण्यांचा वावर आता अगदी सामान्य झाला आहे. परंतु, गावाकडे अनेक जण शेती किंवा व्यवसायासाठी गाय, बैल हे प्राणी पाळतात; मात्र शहरात मोठमोठ्या प्राण्यांना पाळणं कठीण असतं. येथे फक्त श्वान आणि मांजरांचं पालकत्व स्वीकारणंच अनेक जण पसंत करतात. बहुतांशी व्यवसायानिमित्त गाय-बैल कोठे दिसले तरी ते काही गोठ्यांमध्येच आढळतात.

माणूस आणि प्राण्यांचं हे नातं अनेक वर्षांपासून आपण पाहत आलोय. माणसं जेवढी प्राण्यांची काळजी घेतात, त्यांच्यावर प्रेम करतात. त्यापेक्षाही प्राणी माणसांना जास्त जीव लावतात. मुक्या जनावरांच्या या भावना ते नेहमीच त्यांच्या कृतीतून वेळोवेळी व्यक्त करीत असतात.

हेही वाचा… भांडुपमध्ये जलप्रवाहात माणसाचा गेला तोल अन्…, मुसळधार पावसात पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, पाहा VIDEO

परंतु, आजकाल गैरसोय, गैरवर्तणूक किंवा अन्य गोष्टींमुळे काही प्राणी धोकादायक ठरू लागले आहेत. ते कधीही, कुठेही येऊन कोणावरही हल्ला करू लागले आहेत. प्राणी खवळले, तर ते कोणालाही ऐकत नाहीत. सध्या असाच काहीसा प्रकार भररस्त्यात घडला आहे; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका बैलाने स्कूटीवर असणाऱ्या माणसाला उडवले.

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओमध्ये भररस्त्यात अनेक वाहने चालताना दिसतायत. एका ट्रकच्या मागून स्कूटर चालवणारे दोन वाहनचालक सरळ रस्त्याने जात असतात, तेवढ्यात अचानक एक बैल बाजूने येतो आणि धावत्या स्कुटीवर असणाऱ्या माणसावर हल्ला करतो. हल्ला होताच माणूस खाली पडतो आणि एका गाडीखाली येतो. या बैलामागोमाग दोन बैल अजून येतात. या माणसावर हल्ला झाल्यानंतर बाजूला अजून एका वाहनचालकावर हे बैल हल्ला करतात. या धक्कादायक हल्ल्यामुळे त्या दोघांची स्कुटी जागच्या जागी खाली पडते आणि ते दोघे रस्त्यावर कोसळतात.

हा व्हिडीओ @oficsyal_maurya_rudra_ji या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला तब्बल ३.८ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… Mumbai Rains: १ किमीच्या अंतरासाठी रिक्षाचालकाने घेतले तब्बल ‘इतके’ रुपये; मुसळधार पावसाचा VIDEO शेअर करत नेटकरी म्हणाला, “३ महिने…”

युजर्सच्या प्रतिक्रिया

हा धक्कादायक व्हिडीओ पाहून अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया शेअर केल्या. एका युजरने कमेंट करीत लिहिलं की, बापरे बैल किती धोकादायक असतात. तर दुसऱ्याने कमेंट करीत लिहिलं की, या बैलांचा सांभाळ करणारे कुठे आहेत, त्यांना असं रस्त्यावर सोडून त्यांच्या आणि इतर माणसांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तर, एक जण कमेंट करीत म्हणाला की, असं कधीच कोणाबरोबर होऊ नये.

दरम्यान, हा धक्कादायक प्रकार नेमका कुठे घडला हे अद्याप कळलेले नाही. प्राण्यांच्या हल्ल्याचे असे अनेक व्हिडीओ याआधीही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.