Bull attack video: सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. दरम्यान तुम्ही आतापर्यंत साड्यांच्या किंवा कपड्यांच्या दुकानात बायकांची भांडणं बघितली असतील. पण सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये चक्क दोन बैलांची कपड्याच्या दुकानात भांडणं सुरु आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्त्यावर अनेक भटके प्राणी फिरत असतात. कुत्रे, गायी, म्हशी, बैल, असे वेगवेगळे प्राणी रस्त्यावर दिसतात. कधी कधी हे प्राणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतानाही दिसतात. त्यामुळे भटक्या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. कधी कधी पाळीव प्राणीही संतापात हल्ला करताना दिसून येतात. नुकताच दोन संतापलेल्या बैलाचा व्हिडीओ समोर आलाय.

अनेक वेळा लढणारे बैल घरांमध्ये आणि दुकानात घुसतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका दुकानात दोन बैल भांडताना दिसत आहेत. या बैलांनी दुकानात घुसून दुकानातील सर्व सामानाची नासधूस केली. व्हिडिओमध्ये दोन्ही बैल जोरदार भांडत आहेत, दुकानातही हजारोंचे नुकसान झाले आहे. दोन बैलांची ही झुंझ पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. यावेळी त्यांना वेगळं करण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: बायकोला पुलावरुन खाली फेकत होता तेवढ्यात पोलीस…महिलेचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

हा व्हिडिओ दुष्यंत सिंह नगर नावाच्या एका एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत अनेक वेळा पाहिला गेला आहे. अनेक यूजर्सनी व्हिडिओला लाईक केले आहे आणि अनेक यूजर्स व्हिडिओवर कमेंटही करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले… दुकान उद्ध्वस्त झाले आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…बैलांची लढाई थांबवणे प्रत्येकाच्या हातात नाही. त्यानंतर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…भाऊ, कोणालाही दुखापत झाली नाही ना?

व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट झालं नाही. प्राण्यांचे असे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच पहायला मिळते. भटक्या प्राण्यांच्या अशा दहशतीमुळे लोकांच्या मनात भिती बसली आहे.